Pune Landslide Rain: ‘माळीण’च्या भयावह आठवणी पुन्हा जाग्या झाल्या, मावळच्या विसापूर किल्ल्याचा तुकडा घरावर कोसळला, अख्ख कुटुंब एका क्षणात ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं


Pune Maval Landslide: पुण्यातील (Pune News) मावळ तालुक्यातील पाठण गावात दुर्दैवी घटना घडलीये. अतिवृष्टीमुळे विसापूर किल्ल्याचा (Visapur Fort) एक भाग कोसळून या गावातील एक कुटुंब गाडलं गेलंय. नंदू तिकोणेंच्या कुटुंबावर काळरात्र चालून आलीये. नंदू तिकोने, पत्नी आणि मुलगा घरात असताना काळानं घाला घातला. या तिघांचा शोध सुरू असून एनडीआरएफ पथकाकडून बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंतएकाचा मृतदेह सापडला आहे.

मावळ तालुक्यातील (Maval Taluka) पाटण गावात आज (6 जुलै) पहाटे एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित घरातील संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (DDMO), पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच मावळचे तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आलं.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या पुणे येथील 5व्या बटालियनची मदत मागविण्यात आली आहे. त्यानुसार निरीक्षक रविंदर यांच्या नेतृत्वाखाली आणि सहाय्यक कमांडंट चंद्रकेतू शर्मा यांच्या देखरेखीखाली 30 सदस्यांचे (1 अधिकारी, 2 वरिष्ठ अधिकारी आणि 27 जवान) पथक आवश्यक आपत्ती व्यवस्थापन साहित्यांसह सकाळी 5.50 वाजता घटनास्थळाकडे रवाना झाले. सध्या बचावकार्य सुरू असून, अधिकृतरीत्या कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद झालेली नाही.

नेमकं घडलं काय? 

अतिवृष्टीमुळे विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला वसलेल्या पाठण गावात दुर्घटना घडली. नंदू तिकोणेंचं घर किल्ल्यावरुन ढासळलेल्या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. पहाटे 4 वाजता त्यांच्या शेजारी राहणाऱ्या अक्षय भोसलेनं तिकोणेंचं घर पाहिलं, मात्र पुढच्या पाच मिनिटांत स्फोटासारखा आवाज आला अन् तिकोणेंचं घर गायब झालं, असं प्रत्यक्षदर्शी अक्षय भोसले सांगतो. तर दुसरे शेजारी पंकज यांनी तिकोणेंच्या घरात रात्री पंधरा सदस्य होते. पहाटे हा प्रसंग घडला अन् सर्वांच्या मनात धडकी भरली. आता या घरात राहायची इच्छा नसल्याचं ते सांगतात.

पुण्यात पावसाचं रौद्ररूप (Pune Rain Update)

पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळतोय. लोणावळ्यात 24 तासांत तब्बल 670 मिमी पाऊस सुरू आहे. आज सकाळी 6.30 पर्यंतच्या 24 तासांत 670 मिमी पाऊस झालाय. भिरामध्ये 609 मिमी, ताम्हिणी घाटात 580 मिमी पाऊस, तर मावळ तालुक्यातील शिरगावला 540 मिमी पाऊस कोसळलाय. लोणावळा-लवासा दरम्यानच्या आंबोश्यात 537 मिमी पाऊस, तर खोपोलीत 24 तासांत 516 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Pune Rain Updates: पुण्यात पावसाचा जोर वाढणार, हवामान खात्याचा रेड अलर्ट, सिंहगड पर्यटकांसाठी बंद; तर मावळमध्ये ‘माळीण’ची पुनरावृत्ती, भूस्खलनात कुटुंब ढिगाऱ्याखाली गाडलं



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *