Shadashtak Yog 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांची चाल आणि संक्रमण हे फार महत्त्वाचं असतं. अनेकदा यामुळे काही राशींना फायदा होतो तर काही वेळा ग्रहांच्या संक्रमणाचा राशींवर फटका बसतो. त्यानुसार, येत्या 13 जुलै 2026 रोजी डबल षडाष्टक योग निर्माण होणार आहे. हा फार अशुभ योग मानला जातो. तसेच, यामुळे आपल्या जीवनात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे येणारा षडाष्टक योग कोणकोणत्या राशींसाठी धोकादायक ठरणार आहे हे जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी षडाष्टक योग फार आव्हानात्मक ठरणार आहे. या काळात कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांबरोबर तुमचे मतभेद दिसून येतील. आर्थिक जीवनात चढ-उतार पाहायला मिळेल. त्यामुळे येत्या काळात गुंतवणूक करणं टाळा. तसेच, पैशांचे व्यवहार करु नका. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी देखील षडाष्टक योग फार आव्हानात्मक ठरणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच, व्यवसायात कोणतीच मोठी जोखीम हाती घेऊ नका. खर्च सांभाळून करा. तसेच, एखाद्या वादविवादापासून दूर राहा. आपल्या कामाशी काम ठेवा.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीसाठी हा काळ फार कठीण असणार आहे. या काळात तुम्हाला कोणतेही निर्णय अतिशय सावधपणे घ्यावे लागतील. व्यवसायाच्या बाबतीत कोणतीच जोखीम हाती घेऊ नका. तसेच, प्रवास करताना सांभाळून करा. घाईगडबडीत कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी देखील षडाष्टक योग कडक असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कामावर दुर्लक्ष करुन चालणार नाही. तसेच, काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. त्यामुळे तुम्हाला मानसिक ताणही जाणवू शकतो. आर्थिक बाबतीत निर्णय घेताना सावध राहा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! कन्या, तूळ राशीसह ‘या’ 5 राशींना जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागणार लॉटरी, वाचा लकी राशी