C Joseph Vijay flaunts cricket bat signed by Virat Kohli:तमिळ सिनेइंडस्ट्रीचे सुपरस्टार आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय हे या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. आता चर्चा सुरू आहे त्यांना मिळालेल्या एका खास गिफ्टची.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
चेन्नई: तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार ‘थलपती’ अर्थात जोसेफ विजय सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड चर्चेत आहेत. मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळल्यापासून त्यांच्यावर शुभेच्छा आणि भेटवस्तूंचा वर्षाव होत आहे. अशातच आता त्यांना मिळालेल्या एका खास गिफ्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
खरं तर सिनेविश्वातीस सेलिब्रिटी असो किंवा, क्रिडा, राजकीय क्षेत्रातील दिग्गज, हे एकमेकांना गिफ्ट, भेटवस्तू दिल्यानंतर नेहमीच चर्चा होताना दिसते. आता विजय यांना देखील एक खास भेटवस्तू एक मोठ्या सेलिब्रिटीकडून मिळाली आहे. भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली यानं मुख्यमंत्री विजय यांना एक अत्यंत खास आणि मौल्यवान भेट दिली आहे.
विराटचा ऑटोग्राफ असलेली खास बॅट
विराट कोहलीची स्वाक्षरी म्हणजेच ऑटोग्राफ असलेली एक विशेष क्रिकेट बॅट मुख्यमंत्री विजय यांना भेट म्हणून देण्यात आली असून, विजय यांनी या बॅटसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत.
कसं मिळालं हे खास गिफ्ट?
शुक्रवारी एमआरएफ (MRF) कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं तमिळनाडूच्या सचिवालयात मुख्यमंत्री विजय यांची भेट घेतली. एमआरएफचे अध्यक्ष के. एम. मम्मेन, व्हीसी आणि एमडी अरुण मम्मेन तसंच राहुल मम्मेन यांनी या बैठकीत हजेरी लावली होती. राज्यातील कंपनीच्या ५,३०० कोटी रुपयांच्या आगामी प्रकल्पांवर आणि गुंतवणुकीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
या अधिकृत बैठकीदरम्यान, एमआरएफ टीमनं मुख्यमंत्री विजय यांना एक सुखद धक्का दिला. त्यांनी विराट कोहलीची स्वाक्षरी असलेली ‘MRF Genius’ क्रिकेट बॅट विजय यांना सन्मानपूर्वक भेट दिली. विराट कोहली गेल्या अनेक वर्षांपासून एमआरएफ कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे.
सोशल मीडियावर फोटोची चर्चा भेट मिळालेली ही बॅट मुख्यमंत्री विजय यांनी अत्यंत अभिमानानं आणि आनंदाने सर्वांना दाखवली. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये विजय यांनी फॉर्मल सूट परिधान केला असून खांद्यावर पारंपरिक ‘अंगवस्त्रम’ घेतलेलं दिसत आहे. एका हातात विराटची स्वाक्षरी असलेली बॅट पकडून ते पोझ देत आहेत.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा