FIFA 2026 Round of 16 : राउंड ऑफ 16 फेरीतील सर्व संघ ठरले, जाणून घ्या कसे होणार सामने – Marathi News | All teams for the FIFA World Cup 2026 Round of 16 have been decided find out who will face whom


FIFA 2026 Round of 16 : राउंड ऑफ 16 फेरीतील सर्व संघ ठरले, जाणून घ्या कसे होणार सामनेImage Credit source: fifa world cup twitter

FIFA World Cup 2026 Round of 16 Schedule: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत एकूण 48 संघांनी भाग घेतला होता. त्यापैकी 32 संघांची वर्णी राउंड ऑफ 32 मध्ये लागली होती. आता या बाद फेरीतून 16 संघ पुढच्या फेरीत खेळणार आहे. तर एकूण 32 संघ स्पर्धेतून आऊट झाले आहे. आता राउंड ऑफ 16 अर्थात उप उपांत्यपूर्व फेरीत 16 संघ भिडणार आहेत. या फेरीतून 8 संघ बाद होतील, तर 8 संघांना उपांत्यपूर्व फेरीचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे या फेरीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारण एक पराभव जेतेपद जिंकण्याचं स्वप्न भंग करू शकते. फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या राउंड ऑफ 16 मध्ये कॅनडा, मोरक्को, पॅराग्वे, फ्रान्स, ब्राझील, नॉर्वे, मॅक्सिको, इंग्लंड, अमेरिका, स्पेन, पोर्तुगाल, बेल्जियम, स्वित्झर्लंड, इजिप्त, कोलंबिया आणि अर्जेंटिना हे संघ आहे. यापैकी कोणते संघ पुढच्या फेरीत जागा मिळवतात याची उत्सुकता आहे.

कसं आहे राउंड ऑफ 16 चं वेळापत्रक?

    • कॅनडा विरुद्ध मोरोक्को: 4 जुलै, ह्यूस्टन स्टेडियम, रात्री 10:30 वाजता.
    • पॅराग्वे विरुद्ध फ्रान्स: 5 जुलै, फिलाडेल्फिया स्टेडियम, पहाटे 2:30 वाजता
    • ब्राझील विरुद्ध नॉर्वे: 6 जुलै, न्यू जर्सी स्टेडियम, पहाटे 1:30 वाजता
    • मेक्सिको विरुद्ध इंग्लंड: 6 जुलै, मेक्सिको सिटी स्टेडियम, सकाळी 5:30 वाजता
    • पोर्तुगाल विरुद्ध स्पेन: 7 जुलै, डॅलस स्टेडियम, दुपारी 12:30 वाजता
    • अमेरिका विरुद्ध बेल्जियम: 7 जुलै, सिएटल स्टेडियम, सकाळी 5:30 वाजता
    • अर्जेंटिना विरुद्ध इजिप्त: 7 जुलै, अटलांटा स्टेडियम, रात्री 9:30 वाजता
    • स्वित्झर्लंड विरुद्ध कोलंबिया: 8 जुलै, बीसी प्लेस, व्हँकुव्हर, पहाटे 1:30 वाजता

राउंड ऑफ 16 मध्ये या लढतींकडे लक्ष

  • पोर्तुगाल विरुद्ध स्पेन: राउंड ऑफ 16 मध्ये युरोपातील दोन मोठे संघ भिडणार आहे. हा या स्पर्धेतील सर्वात मोठा सामना असणार आहे. या सामन्याकडे खासकरून रोनाल्डोच्या चाहत्यांचं लक्ष लागून आहे.
  • अर्जेंटीना विरुद्ध इजिप्त : गतविजेता अर्जेंटीना संघ सध्या फॉर्मात आहे. लियोनल मेस्सीच्या नेतृत्वात संघ चांगली कामगिरी करत आहे. असं असताना मोहम्मद सलाहच्या झुंजार इजिप्त संघाचा सामना वाटतो तितका सोपा नसेल.
  • ब्राझील विरुद्ध नॉर्वे : ब्राझील संघ जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचं मानलं जातं. पण आता परीक्षा कठीण असणार आहे. ब्राझीलची या फेरीत लढत अर्लिंग हॉलंड असलेल्या नॉर्वे संघासी होणार आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *