Hardik Pandya Trade IPL 2027 : भारतीय क्रिकेटमधील स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आयपीएल 2027 पूर्वी त्याच्या ट्रेडबाबत अनेक दावे आणि चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियावर आणि काही अहवालांमध्ये असा दावा केला जात आहे की, मुंबई इंडियन्स (MI) आपला कर्णधार हार्दिक पांड्याला चेन्नई सुपर किंग्स (CSK) किंवा कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्याकडे ट्रेड करण्याचा विचार करत आहे. मात्र, या सर्व चर्चा अद्याप अधिकृतरीत्या कोणत्याही फ्रँचायझीकडून किंवा आयपीएलकडून पुष्टी झालेल्या नाहीत. त्यामुळे या घडामोडींना सध्या केवळ चर्चेच्या स्वरूपातच पाहणे योग्य ठरेल.
हार्दिक पांड्या CSKमध्ये जाणार?
चर्चेनुसार, चेन्नई सुपर किंग्स हार्दिक पांड्याला आपल्या संघात सामील करण्यास इच्छुक आहे. महेंद्रसिंग धोनीच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याची संधी हार्दिकलाही चांगले वाटले, अशी चर्चा रंगली आहे. सध्या चेन्नईचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करत आहेत. अशा परिस्थितीत हार्दिक संघात आला, तर त्याला कर्णधारपद दिले जाईल का, हा मोठा प्रश्न आहे. काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हार्दिकला संघात आणायचे झाल्यास CSKला नेतृत्वात बदल करावा लागू शकतो.
आयुष म्हात्रे आणि खलील अहमदच्या बदल्यात हार्दिक?
ट्रेडबाबतच्या चर्चांमध्ये आणखी एक मोठा दावा समोर आला आहे. त्यानुसार, मुंबई इंडियन्सने हार्दिकच्या बदल्यात चेन्नईकडे दोन खेळाडूंची मागणी केली असल्याचे बोलले जात आहे. त्यामध्ये, डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमद आणि 18 वर्षीय प्रतिभावान फलंदाज आयुष म्हात्रे यांचा समावेश असल्याचा दावा केला जात आहे. जर हा ट्रेड प्रत्यक्षात झाला, तर मुंबईला भविष्यासाठी एक युवा फलंदाज आणि अनुभवी वेगवान गोलंदाज मिळू शकतो, तर चेन्नईला अनुभवी अष्टपैलू आणि संभाव्य कर्णधार मिळेल.
🚨 MASSIVE UPDATE ON HARDIK PANDYA TRADE 🚨
-Hardik Pandya has reportedly made CSK his top priority for IPL 2027.
-MS Dhoni is believed to have personally spoken with Hardik about the move.
-KKR remain interested and are ready to hand him the captaincy.
-Mumbai Indians has asked… pic.twitter.com/yiOOQ1I3pK— JB (@93Yorker) July 3, 2026
KKRही हार्दिकच्या शर्यतीत?
हार्दिक पांड्याच्या नावाची चर्चा फक्त चेन्नईपुरती मर्यादित नाही. कोलकाता नाईट रायडर्स देखील हार्दिकला आपल्या संघात आणण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. दाव्यानुसार, केकेआर हार्दिकला थेट कर्णधार बनवू शकते. त्यासाठी मुंबई इंडियन्सने रिंकू सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांची मागणी केल्याची चर्चा आहे. मात्र, केकेआरसाठी हे दोन्ही खेळाडू संघाचा महत्त्वाचा भाग असल्याने असा ट्रेड करणे सोपे नसेल, असे मानले जात आहे.
अनेक फ्रँचायझींची हार्दिकवर नजर
चर्चांनुसार, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वगळता जवळपास सर्व आयपीएल फ्रँचायझी हार्दिक पांड्याला आपल्या संघात घेण्यास उत्सुक असल्याचे म्हटले जात आहे. हार्दिकसारखा अनुभवी अष्टपैलू, आक्रमक फलंदाज आणि नेतृत्वाची क्षमता असलेला खेळाडू कोणत्याही संघासाठी मोठी ताकद ठरू शकतो. त्यामुळे आगामी ट्रेड विंडोमध्ये त्याच्या नावाची सर्वाधिक चर्चा होण्याची शक्यता आहे. सध्या हार्दिक पांड्याच्या ट्रेडबाबत सोशल मीडियावर आणि विविध अहवालांमध्ये अनेक दावे केले जात असले, तरी मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स किंवा आयपीएल प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
हे ही वाचा –