Crime Thriller on OTT: दर आठवड्यात ओटीटीवर धमाकेदार ॲक्शन, क्राईम सस्पेन्स चित्रपट व वेब सिरीज आणि चित्रपट येत असतात. हे चित्रपट सध्या प्रचंड पाहिले जात आहेत. अशाच एका सस्पेन्स क्राईम थ्रिलरची OTT वर चर्चा रंगलीय. रहस्य, वेदना, भीती आणि न्यायासाठीच्या जीवघेण्या संघर्षावर असलेला एक सस्पेन्स थ्रिलर सध्या ओटीटीवर प्रदर्शित झालाय. जवळपास 2 तास 43 मिनिटांच्या या चित्रपटात सत्ता आणि भीतीचा थरार प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः काटा आणतोय. दिलजीत दोसांज, आणि अर्जुन रामपाल यांचा हा चित्रपट सध्या zee5वर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, या ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे.
कोणता आहे हा सिनेमा ?
हनी त्रेहान दिग्दर्शित ‘सतलज’ ही केवळ एक क्राइम सस्पेन्स थ्रिलर सत्ता, भीती आणि शांततेच्या पडद्याआड सुरू असलेल्या न्यायाच्या लढ्याची गोष्ट दाखवतो. काही कथा केवळ मनोरंजनासाठी असतात, तर काही कथा संपूर्ण समाजाला विचार करायला भाग पाडतात. ‘सतलज’ ही अशाच प्रकारची गोष्ट आहे, जी एका व्यक्तीच्या संघर्षातून राष्ट्राच्या मुळाला हादरवणारा प्रश्न उभा करते .
काय आहे चित्रपटाची गोष्ट ?
या चित्रपटात दिलजीत दोसांझने मानवाधिकारांसाठी लढणाऱ्या जसवंत सिंह यांची भूमिका साकारली आहे. ट्रेलरमध्ये त्यांनी ही व्यक्तिरेखा अत्यंत प्रभावीपणे उभी केली असून, त्यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्यासोबत अर्जुन रामपालही महत्त्वाच्या भूमिकेत दिसत असून, दोघांची स्क्रीन प्रेझेन्स ट्रेलरमध्ये लक्ष वेधून घेते.‘सतलज’ची कथा अशा काळावर आधारित आहे, जेव्हा दहशतवाद, राजकीय हिंसा आणि भीतीमुळे समाजात अस्थिरता निर्माण झाली होती. त्या काळात हजारो लोक रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले होते आणि त्यांच्या कुटुंबांना न्यायासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागला. या चित्रपटातून त्या वेदनादायक सत्याची आणि त्या मागे दडलेल्या सत्तेच्या खेळाची संवेदनशील मांडणी करण्यात आली आहे. जसवंत सिंह यांचा विश्वास होता की प्रत्येक बेपत्ता व्यक्तीचा हिशोब मिळायलाच हवा. यासाठी त्यांनी 25 हजारांहून अधिक बेपत्ता लोकांसाठी न्याय मिळवण्याची लढाई लढली.