Nashik Accident News : नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. मद्यपी चालकाने भरधाव ट्रक चालवून वाहन व पादचाऱ्यांना धडक दिली आहे. या अपघातात सहा जण जखमी झआले आहेत, तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. मद्यपी ट्रक चालकाला नागरिकांनी पाठलाग करत पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.
नागरिकांनी पाठलाग करुन ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले
मद्यपी चालकाने भरधाव ट्रक चालवून रस्त्यावरील दोन ते तीन वाहनासह रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्यांना धडक दिल्याची घटना नाशिकच्या मनमाड शहरात घडली. इंदूर- पुणे या वर्दळीच्या रस्त्यावर ही घटना घडली आहे. या अपघातात सहा जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर काही नागरिकांनी पाठलाग करुन ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अपघातानंतर मोठ्या प्रमाणावर दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती.
रायगडच्या ताम्हिणी घाटात दुचाकीचा भीषण अपघात, दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मुत्यू
रायगडच्या ताम्हिणी घाटात कोंडेथर गावाच्या हद्दीत दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मुत्यू झाला आहे. अखिल जाधव असं मृत दुचाकीस्वारचं नाव आहे. अखिल जाधव हे माणगाव येथे महसूल विभागात सहाय्यक म्हणून कार्यरत होते. माणगाववरुन पुणे दिशेकडे जात असताना कोंडेथर गावच्या हद्दीत दुचाकी स्लीप होऊन त्यांचा अपघात झाला आहे.
अहिल्यानगरच्या राहुरी शहरात खासगी स्कुल बस पलटी, 20 ते 25 मुली जखमी
अहिल्यानगरच्या राहुरी शहरातील सौ. भागीरथीबाई तनपुरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी खासगी स्कुल बस पलटी होऊन अनेक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्याची घटना काल सायंकाळी घडली होती. राहुरी स्टेशन रोड परिसरात ही घटना घडली असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पाच वाजता शाळा सुटली त्यानंतर रेल्वे स्टेशन, तांदूळवाडी, कोंढवड, शिलेगांव या भागातील शाळकरी मुली खासगी बसमध्ये घरी परतत असताना तांदुळवाडी शिवारातील बिरोबा मंदिर जवळ बसचा रॉड तुटला त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्याकडेला असलेल्या शेतात जाऊन उलटली .यावेळी बसमध्ये 40 ते 45 शाळकरी मुली होत्या. या घटनेत 20 ते 25 मुली गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच अनेक रुग्णवाहिका चालकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी मुलींना शहरातील तीन ते चार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व मुली तांदूळवाडी, कोंडवड आणि शिलेगांव येथील आहेत. या घटनेमुळे पालक वर्गात प्रचंड खळबळ उडाली होती.
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर