Aamir khan and gauri spratt: उद्या म्हणजेच 5 जुलै रोजी बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan Wedding) पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकणार आहे. तो तिसऱ्यांदा गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत (Who is Gauri Spratt) लग्नाची गाठ बांधणार आहे. अलिकडेच माध्यमांशी (Entertainment) संवाद साधताना त्यानं आपल्या लग्नाच्या बातमी दुजोरा दिली. 5 जुलै रोजी लग्न करणार असल्याचं त्यानं सांगितलं. आपल्या बिग डे बाबत माहिती शेअर (Bollywood) करताना आमिर म्हणाला, त्याचं हे लग्न अगदी साध्या पद्धतीने होणार आहे. कुटुंबातील सदस्य आणि खासगी मित्र परिवारांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा होणार आहे.
आमिर खान आणि गौरी स्प्रॅटच्या लग्नात कोण कोण येणार? (Aamir khan and gauri spratt wedding on 5th july)
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांनी आपलं लग्न अगदी साध्या पद्धतीने आयोजित केले आहे. त्यांनी सिंपल आणि प्रायव्हेट पद्धतीने लग्न करण्याचे योजिले आहे. अगदी मोजक्या पाहुण्यांमध्ये त्यांचा हा लग्न सोहळा पार पडणार आहे. आमिर खानच्या लग्नात अगदी 100 ते 150 लोक उपस्थित असणार आहेत. यात काही फिल्म इंडस्ट्रीतील लोकांचीही उपस्थिती असणार असल्याची माहिती आहे.
विवाह कायद्यांतर्गत जोडप्याच्या विवाहाची नोंदणी केल्यानंतर लग्नसमारंभाला सुरुवात केली जाणार आहे. यानंतर उपस्थित पाहुण्यांसाठी छोटेखानी जेवणाचे आयोजन करण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, जेवणाच्या मेन्यूमध्ये या कपलच्या काही आवडत्या पदार्थांचा समावेश असणार आहे. आमिर आणि गौरी या दोघांनीही यात वैयक्तिक लक्ष घातले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या लग्न सोहळ्यात दोघांचीही मुलं उपस्थित असती. या लग्नसोहळ्यात फिल्ममेकर आशुतोष गोवारीकर आणि दिग्दर्शक राज कुमार संतोषी देखील उपस्थित राहण्याती शक्यता आहे. गुरुवारी सायंकाळी माध्यमांशी संवाद साधताना त्यानं आपल्या लग्नाबाबत कबुली दिली. अभिनेता म्हणाला, ‘हां. माझं 5 जुलै रोजी लग्न होणार आहे. घरातच अगदी लहान पद्धतीने लग्न होणार आहे. तुम्हा सर्वांचा आशीर्वाद हवा आहे’, असं त्यानं म्हटलं होतं. दरम्यान, बी टाऊनमध्ये सध्या आमिर खानचं लग्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
‘वेलकम टू द जंगल’ ची दुसऱ्या आठवड्यात दमदार एन्ट्री; 8व्या दिवशी किती कोटी कमावले? 100 कोटींकडे झेप