Alpha Box Office Collection 1st Day: आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांच्या प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतिक्षित स्पाय ॲक्शन थ्रिलर ‘अल्फा’ (Alpha Box Office Collection) 3 जुलैला जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांना या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या.पण पहिल्याच दिवशी मिळालेल्या थंड प्रतिसादाने अनेकांची निराशा केली.अल्फा चित्रपटाला पहिल्या दिवशी फारसा प्रतिसाद मिळाला नाही. प्रचंड प्रमोशन करूनही पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 10 कोटी रुपयेही हा चित्रपट कमावू शकला नाही. सकाळी 9 वाजता लावलेल्या 9000 शोपैकी केवळ 10% टक्के चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक उपस्थित होते.आणि जे आले, त्यापैकी बहुतेक जणांची निराशाच झाली. जवळपास 130 कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी 9 कोटी रुपये कमावले.
‘अल्फा’ पहिल्याच दिवशी पडला फिका?
अल्फा या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे लेखन अभिनेता उदय चोप्राय यांनी केले असून या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली आहे. ‘द रेल्वे मॅन’ फेम शिव रावळ यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात आलिया आणि शर्वरी यांच्या व्यतिरिक्त अनिल कपूर आणि बॉबी देवल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ऋतिक रोशनने या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. Yrf स्पाय युनिव्हर्समधील हा सातवा चित्रपट आहे. यापूर्वी yrf ची निर्मिती असलेले वर पठाण, टायगर 3, टायगर जिंदा है, एक था टायगर, वॉर 2 या चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सगळ्या चित्रपटांची पहिल्या दिवसाची कमाई 30 कोटी ते 60 कोटी रुपयांपर्यंत गेली होती. मात्र, हा एकमेव असा चित्रपट आहे जो 9 कोटींवरच अडकला.
#Alpha has taken an extremely poor opening of around ₹8.50 Cr nett in India.
Considering its massive budget, the Spy Universe franchise , a wide release across 2,700 screens and an A-list star cast, the film should have opened at a minimum of ₹15 Cr nett.
Even this opening…
— Sumit Kadel (@SumitkadeI) July 4, 2026
सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, अल्फा चित्रपटाने जगभरात 15.80 कोटी रुपये कमावले असून भारतात या चित्रपटाचं नेट कलेक्शन 9 कोटी रुपयांवर स्थिरावलं. पहिल्याच दिवशी काहीसा सुस्त प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला. मात्र, वर्ड ऑफ माऊथवर हा चित्रपट हिट ठरणार की फ्लॉप हे अवलंबून असणार आहे. चित्रपटातील ॲक्शन आणि अभिनयाचे कौतुक झाले असले तरी कमकुवत कथा नका मुळे या चित्रपटाला फटका बसत असल्याचा दिसतंय. YRF च्या युनिव्हर्समधील हा पहिला महिला केंद्रित चित्रपट होता. पण पहिल्याच दिवशी या चित्रपटाला मिळालेला थंड प्रतिसाद आणि निराशाजनक ओपनिंगमुळे आलिया भट, शर्वरी वाघ आणि दिग्गज कलाकारांची टीम येणाऱ्या आठवड्यांमध्ये चांगली कमाई करते की बॅकफूटवरच थांबते, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.