Womens T20 World Cup : वर्ल्ड कप फायनलमध्ये सर्वाधिक वेळा पोहचणारे संघ, ऑस्ट्रेलियाच्या आसपासही कुणी नाही – Marathi News | Most successful teams who qualify in final of womens t20i world cup history australia england new zealand southa Africa india see stats


अखेर 32 सामन्यांच्या थरारानंतर आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील फायनलसाठी 2 संघ निश्चित झाले आहेत. ऑस्ट्रेलियानंतर आता इंग्लंडने अंतिम फेरीत धडक दिली आहे. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजवर मात करत फायनलमध्ये आठव्यांदा प्रवेश केला. तर इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला पराभवाचं पाणी पाजत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. आता वर्ल्ड कप कोण जिंकणार? हे येणाऱ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. अंतिम सामना हा रविवारी 5 जुलैला खेळवण्यात येणार आहे. या निमित्ताने वुमन्स टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक वेळा अंतिम सामन्यात खेळणाऱ्या संघांबाबत जाणून घेऊयात.

ऑस्ट्रेलियाच्या नावावर वुमन्स टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत सर्वाधिक वेळा खेळण्याचा विक्रम आहे. तसेच ऑस्ट्रेलियानेच सर्वाधिक वेळा टी 20i वर्ल्ड कप जिंकला आहे. ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त आणखी कोणते संघ किती वेळा अंतिम फेरीत पोहचलेत? हे जाणून घेऊयात.

ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंड सर्वाधिक वेळा टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याबाबत दुसऱ्या स्थानी आहे. इंग्लंडची यंदाची अंतिम फेरीत पोहण्याची पाचवी वेळ आहे. तर न्यूझीलंड तिसऱ्या स्थानी आहे. न्यूझीलंड 3 वेळा फायनलमध्ये पोहचली आहे. तर दक्षिण आफ्रिका चौथ्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिकेने 2 वेळा अंतिम फेरीत धडक दिली आहे. पाचव्या स्थानी वेस्ट इंडिज विराजमान आहे. विंडीज पहिल्याच प्रयत्नात वर्ल्ड कप जिंकण्यात यशस्वी ठरली होती. तर टीम इंडियाला आतापर्यंत फक्त एकदाच अंतिम फेरीत पोहचता आलंय. टीम इंडियाचा अंतिम फेरीत पराभव झाला होता. टीम इंडियाला तेव्हा अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने पराभूत केलं होतं. तर यंदा भारताचं साखळी फेरीतच पॅकअप झालं.

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि टीम इंडिया या व्यतिरिक्त कोणत्याही संघाला वुमन्स टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचता आलेलं नाही.

ऑस्ट्रेलियाचा दबदबा

ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत आठव्यांदा धडक दिलीय. ऑस्ट्रेलियाने याआधी 6 वेळा टी 20i वर्ल्ड कप जिंकला आहे. तर इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड या 3 संघांनी प्रत्येकी 1-1 वेळा टी 20i वर्ल्ड कप उंचावला आहे. त्यामुळे आता वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वाचा विजेता कोण ठरणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *