Last Updated:
अफगाणिस्तानची मॅच सुरू असताना प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये मोठा ड्रामा पाहायला मिळाला. स्टेडियममधून एक प्रेक्षक थेट मैदानात आला आणि फिल्डिंगसाठी उभ्या असलेल्या रहमनुल्लाह गुरबाजजवळ गेला.
मुंबई : अफगाणिस्तानची मॅच सुरू असताना प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये मोठा ड्रामा पाहायला मिळाला. स्टेडियममधून एक प्रेक्षक थेट मैदानात आला आणि फिल्डिंगसाठी उभ्या असलेल्या रहमनुल्लाह गुरबाजजवळ गेला. यानंतर त्याने गुरबाजच्या डोक्यावर असलेली टोपी घेतली आणि टोपी घेऊन तो तिथून पळून गेला. अफगाणिस्तानच्या शपगीजा क्रिकेट लीग 2026 मध्ये हा प्रकार घडला आहे. बँड ए अमीर ड्रॅगन्स आणि मिस ऐनक नाईट्स यांच्यातल्या सामन्यात ही घटना घडली.
गुरबाजची टोपी घेऊन पळाला
पहिली इनिंग सुरू असताना रहमनुल्लाह गुरबाज फिल्डिंग करत होता, तेव्हा एक फॅन सुरक्षा तोडून मैदानात आला आणि थेट गुरबाजजवळ गेला. यानंतर सुरक्षारक्षकही त्याच्या मागे धावले. गुरबाजने चाहत्यासोबत हात मिळवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने थेट गुरबाजच्या डोक्यावरची टोपी काढली आणि तो टोपी घेऊन पळाला.
गुरबाजचं अर्धशतक
गुरबाज मिस ऐनक नाईट्सचा कर्णधार आहे. बँड ए अमीर ड्रॅगन्सने या सामन्यात पहिले बॅटिंग केली आणि त्यांचा शेवटच्या ओव्हरमध्ये 114 रनवर ऑलआऊट झाला. अजीजुल्ला मियाखिलने सर्वाधिक 30 रन तर फरमनुल्लाहने 20 रन केले. जिआऊर रहमानने 2.3 ओव्हरमध्ये 12 रन देऊन 3 विकेट घेतल्या तर मुजीब उर रहमानलाही 3 विकेट घेण्यात यश आलं.
या आव्हानाचा पाठलाग मिस ऐनक नाईट्सने 10व्या ओव्हरमध्येच केला. ओपनर खालिद तनिवालने 22 बॉलमध्ये 53 रनची खेळी केली ज्यात 7 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. तर कर्णधार गुरबाजने फक्त 30 बॉलमध्ये 52 रन ठोकले. दोघांमध्ये 51 बॉलमध्ये 102 रनची पार्टनरशीप झाली. मिस ऐनक नाईट्सचे 2 सामन्यांमध्ये 3 पॉईंट्स झाले आहेत. टीमचा हा पहिलाच विजय होता, पावसामुळे पहिला सामना रद्द झाला होता. तर ड्रॅगन्सचा 3 सामन्यांमधला हा तिसरा पराभव होता.
Mumbai,Maharashtra
Jul 03, 2026 11:46 PM IST
