BMC : विरोधी पक्षनेत्यांनी गोपनीयता भंग केली, गुन्हा दाखल करणार, रितू तावडेंचा इशारा; माझ्या कार्यालयात फोटो काढले, कसली गोपनीयता भंग केली, किशोरी पेडणेकरांचा प्रतिसवाल


Ritu Tawde Kishori Pednekar मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्यात फोनवरुन वाद झाल्यानंतर वादाचा नवा अंक समोर आला आहे. रितू तावडे यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पत्र देणार असल्याचं म्हटलं. तर, किशोरी पेडणेकर यांनी रितू तावडे यांच्याकडून बालिश आरोप केले जात असल्याचं म्हटलं. आता हा वाद आणखी किती वाढणार याकडे सर्वांंचं लक्ष लागलं आहे.       

पेडणेकरांवर गुन्हा दाखल करणार : रितू तावडे

महापौर रितू तावडे यांनी किशोरी पेडणेकर यांच्यासोबत फोनवर झालेल्या वादानंतर पत्रकार परिषद घेतली. महापौरांची परवानगी न घेता, संवेदनशील अशा महापौरांच्या दालनात त्या आल्या त्याबाबत वाद नाही. पेडणेकर यांनी त्यांच्या पत्राची विचारपूस केली तर ठीक आहे, मात्र त्यांनी दमदाटी केली, मोबाईल ऑन करुन ट्रेस पासिंग करत होत्या, रेकी करत होत्या, काय महत्त्वाचं शोधत होत्या. दमदाटी करुन पेपर्स चाळणं सुरु होतं, अशी वागणूक विरोधी पक्षाच्या नेत्यांना शोभत नाही, असं रितू तावडे म्हणाल्या.  

किशोरी पेडणेकर स्वत:च्या दालनात केल्या. एम.एस. मनोज कांबळे यांना बोलावून घेतलं. माझ्या दालनात मनोज कांबळेंच्यावतीनं फोन केला. त्यावरुन गोपनीय कागदपत्रं मागवून घेतली. दोन्ही पीएसला बोलावून घेतलं आणि त्याचे फोटो काढले. महापौरांच्या दालनात विरोधी पक्षनेत्यांची वागणूक गैरवर्तन ठरते. किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारं पत्र पोलीस स्टेशनला देत असल्याचं रितू तावडे यांनी म्हटलं. 

कॅमेरा ऑन करुन माझ्या दालनात किशोरी पेडणेकर यांनी ट्रेसपासिंग केलं. तो एक गुन्हा आहे, मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्याला न शोभणारी कृती पेडणेकर यांनी केली आहे, असा आरोप रितू तावडेंनी केला. महापौर म्हणून मी पावसात भिजून पाहणी करत होते, असंही तावडेंनी म्हटलं. मुंबईकरांचे समस्या सोडवायच्या असतील तर त्यांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे असा टोला देखील तावडे यांनी लगावला.

किशोरी पेडणकेर काय म्हणाल्या?

महापौरांनी केलेल आरोप गंभीर नसून बालिश आरोप आहेत. मूळात आरोपच नाही, माझा महापौरांचा काडीचा संबंध नाही. महापौरांच्या दालनातील एमएस विभागाला पत्र दिलं. ते पहिलं पत्र त्यांच्याकडे जातं, ते त्याचा इतिवृत्तांत बनवतात, महापौरांची सही घेतात आणि पत्राचं उत्तर देतात. 30 मार्चपासून पत्रव्यवहार करतोय पण एकाही पत्राचं उत्तर आलं नाही, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. 

पावसाळ्यापूर्वी विशेष सभा घेण्यासाठी पत्र दिली होती. आमच्या पत्राला उत्तर आलं नाही. रक्तपेढीवर पत्र दिली नाही, इतकी पत्र दिली पण त्याचं उत्तर आलं नाही. मला शांत, गुळगुळीत बोलायला जमत नाही. माझ्या अखत्यारित येणाऱ्या स्टाफला मी जर विचारलं तर ते महापौरांना काय ते ऑफिस आंदण दिलंय का? असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला. जिथं सर्व येऊन बसतात, मुंबईकर जिथं येऊन बसतात, पत्र देतात, तिथं मी गेली होती. बालिश आरोप केले जात आहेत. एमएस सांगतात आम्ही पत्र तयार करतो पण सही केली जात नाही, असं पेडणेकर यांनी म्हटलं. 

मी एमएसला सांगितलं की पत्रांची उत्तर घेऊन या, दिली असतील तर दाखवा. नगरसेवकांची पत्र दिली आहेत, ती दाखवा. एमएस जे उतारा तयार करतात, त्यावर रितू तावडेंची सही नाही. मी माझ्या कार्यालयात फोटो काढले आहेत. गोपनीयता मी कसली भंग केली, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला. आम्ही पण महापौर होतो, पत्राचं उत्तर देणं आठ दिवसात देणं आवश्यक असतं. मी महापौर बसतात तिथं गेलेली नाही, त्या बालिश आरोप करतायत, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *