त्यांच्या स्पष्ट स्वभावामुळे अनेक कलाकार त्यांच्यासोबत काम करण्यास कचरायचे अशी चर्चा त्या काळात होती. राजकुमार यांनी मदर इंडिया, वक्त, हमराज, हीर रांझा, कुदरत, सौदागर आणि तिरंगा यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांत भूमिका साकारल्या. त्यांच्या ‘जानी…’ या शैलीतील संवाद आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.