हा प्रकार पाहून गोविंदाला धक्काच बसला होता, पण समोर राज कुमार होते. त्यांनी अत्यंत शांतपणे गोविंदाला सांगितले, “जानी, तुझा शर्ट खूप छान होता. कापड एकदम भारी होतं, म्हणून मी याचा रुमाल बनवला.” यावर गोविंदा काहीच बोलू शकला नाही. तो बिचारा फक्त पाहतच राहिला.
