EPFO :  आता पीएफ खात्यातील 1800 रुपयांवरील योगदान ऐच्छिक, ईपीएफओचा मोठा निर्णय, जाणून कोणाला फायदा होणार?


नवी दिल्ली : केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयानं नवीन कर्मचारी भविष्य निधी योजना 2026 नुसार 15000 रुपयांच्या मासिक वेतनावरील योगदान ऐच्छिक केलं आहे. याचाच अर्थ 1800 रुपयांच्या वरील रक्कमेचं योगदान (अंशदान)  अनिवार्य नसेल.  
सोमवारी अधिसूचित झालेल्या नव्या ईपीएफ योजनेनुसार एखाद्या सदस्यासाठी योगदान केंद्र सरकारकडून वेळोवेळी सूचित केलेल्या वेतन मर्यादेच्या अधीन असेल. 

अधिसूचनेचा, ‘‘पॅरा 9 चा उप-पॅराग्राफ (4) च्या तरतुदीनुसार  एखाद्या सदस्याचं मासिक वेतन निर्धारित वेतन मर्यादेपेक्षा अधिक असेल तर नियोक्ता आणि कर्मचारी यांचं योगदान केवळ वेतन मर्यादेच्या आधारावर देय असलेल्या योगदानापर्यंत मर्यादित राहील. ज्या प्रकरणांमध्ये 1995 नुसार उच्च वेतनावर योगदानाची परवानगी देण्यात आली आहे, त्यात नियोक्ता वेतन मर्यादेपेक्षा अधिक हिस्सा पेन्शनमध्ये जमा करु शकतो. 

योजनेनुसार नियोक्त्याचं अंशदान हे संबंधित कर्मचाऱ्याच्या वेतनाच्या 12 टक्के असेल. कर्मचाऱ्याचं योगदान देखील 12 टक्के म्हणजे 1800 रुपये असेल. सध्या 15 हजार रुपयांच्या वेतन मर्यादेवर 12 टक्क्यांहून अधिक रक्कम पीएफ म्हणून दिली जाते. जी, 1800 रुपयांपेक्षा अधिक असेल.  नव्या व्यवस्थेनुसार 1800 रुपयांवरील योगदान हे कर्मचारी आणि नियोक्ता यांच्या इच्छेवर अवलंबून असेल. 

दरम्यान, कर्मचारी भविष्य निधी योजना 1952 नुसार कर्मचारी योजनेत सहभागी झाल्यानंतर त्यांच्या मूळ वेतनावर योगदान जमा करायचे. नियोक्ता देखील तितकी रक्कम जमा करायचे. 2014 मधील दुरुस्तीनंतर नियोक्ता योगदान 8.33 टक्के म्हणजेच 15000 रुपयांचं 8.33 टक्के म्हणजे 1250  रुपयांपर्यंत मर्यादित होतं.  त्यापेक्षा अधिक रक्कम ईपीएफ खात्यात जमा केली जात होती.   

नव्या ईपीएफओ योजने आणखी एक तरतूद असून त्यात कर्मचारी पेन्शेन योजना 1995 नुसार अधिक वेतनाला परवानगी आहे. नियोक्ता म्हणजेच एम्प्लॉयर वेतन मर्यादेपेक्षा अधिक रक्कम पेन्शन योजनेत जमा करु शकतात. नव्या बदलानंतर कर्मचारी आणि नियोक्ता यांना मर्यादित स्वरुपात योगदान करण्याचा किंवा अधिक रक्कम पीएफ खात्यात जमा करु शकतात. 

दरम्यान, ईपीएफओ पोर्टल  26 जूनपासून बंद आहे. सुरुवातीला 29  जूनला पोर्टल सुरु होणं अपेक्षित होते. ते आता 3 जुलै रोजी सुरु होणार आहे. तर, ईपीएफओकडून व्याज कधी दिलं जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ईपीएफओनं खातेदारांना 8. 25 टक्के व्याज देण्याची घोषणा केली आहे. केंद्राकडून मंजुरी देखील मिळाल्याची माहिती आहे. 

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *