चित्रपटात खाशाबांची मुख्य भूमिका कोण साकारतंय, हे गुपित अजूनही गुलदस्त्यात असलं, तरीही टीझरमधून या चित्रपटाची भव्यता लक्षात येतेय. चित्रपटात जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर, छाया कदम आणि प्रसिद्ध कुस्तीपटू संग्राम सिंग यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या ऐतिहासिक कथेला अजय-अतुल या सुप्रसिद्ध जोडीचं संगीत लाभलंय. त्यांच्या संगीतामुळे सिनेमातील कुस्तीचे फड आणखीनच जिवंत वाटणार, यात शंका नाही.
