Ravi Shastri on Vaibhav Sooryavanshi : भारताचा 15 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी इंग्लंडमध्ये प्रचंड चर्चेत आहे. आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत पदार्पणाची संधी मिळाली नसली तरी, इंग्लिश मीडिया आणि माजी क्रिकेटपटू सातत्याने त्याचे कौतुक करत आहेत. जर वैभवने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पदार्पण केले, तर तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरेल. दरम्यान, 15 वर्षीय वैभवला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी कधी मिळणार, याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांमध्ये कायम आहे. याच मुद्द्यावर भारताचे माजी प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू रवि शास्त्री यांनी लाईव्ह शोमध्ये प्रतिक्रिया देताना एक भन्नाट वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
रवि शास्त्री नेमकं काय म्हणाले? (Ravi Shastri on Vaibhav Sooryavanshi)
सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चर्चेदरम्यान शास्त्रींना विचारण्यात आलं की, वैभव सूर्यवंशीला इंग्लंडविरुद्ध संधी मिळायला हवी का? यावर त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “अरे, वैभवला आयर्लंडमध्येच खेळवायला हवं होतं. तिथलं मैदान लहान होती. त्याने तिथे स्टेडियमच्या छप्परवर चेंडू मारला असता. तिथे तर त्याने आयर्लंडची पॅन्ट काढून हातात दिली असती. आता इथे इंग्लंडमध्ये खेळवतील की नाही, माहीत नाही…” शास्त्रींच्या या विधानातील ‘पॅन्ट काढून हातात देणं’ हा शब्दशः अर्थ नसून हिंदीतील एक लोकप्रिय मुहावरा आहे. त्याचा अर्थ समोरच्या संघावर पूर्णपणे वर्चस्व गाजवणे, जोरदार धुलाई करणे किंवा प्रतिस्पर्ध्याला पूर्णपणे नामोहरम करणे, असा होतो.
“Arrey, woh khelna chahiye tha yaar!” 👀
Ravi Shastri’s brutally honest take on Vaibhav Sooryavanshi 💬
Watch #ENGvIND, 2nd T20I on 4th July, 6 PM onwards, LIVE on Sony Sports Network TV channels.#SonySportsNetwork #MamlaPersonalHai #ExtraaaInnings pic.twitter.com/0S9yMguEig
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 1, 2026
IPL मधील कामगिरीचं शास्त्रींनी केलं कौतुक
रवि शास्त्री पुढे म्हणाले, “त्याला जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर भारतीय संघात खेळवा. आयपीएलमध्ये त्याने जवळपास प्रत्येक गोलंदाजाची धुलाई केली आहे. मोठ्या-मोठ्या वेगवान गोलंदाजांनाही त्याने सोडलं नाही. अशा खेळाडूला तुम्ही फक्त बेंचवर बसवून ठेवत आहात.” त्यांच्या मते, वैभवमध्ये मोठी क्षमता आहे आणि त्याला संधी देण्यास उशीर करू नये.
’15 वर्षांच्या मुलावर कोणताही दबाव नाही’
शास्त्रींच्या मते, वैभव सूर्यवंशीचं सर्वात मोठं बलस्थान म्हणजे त्याच्यावर कोणताही मानसिक दबाव नाही. ते म्हणाले, “तो फक्त 15 वर्षांचा आहे. त्याला भीती नाही, दडपण नाही. जर तो सुरुवातीच्या दोन-तीन षटकांतच आक्रमक फलंदाजी करू लागला, तर संघ व्यवस्थापनाला त्याच्यासाठी कायमस्वरूपी जागा तयार करावी लागेल. म्हणूनच त्याला लवकरात लवकर संधी द्यायला हवी.”
आयर्लंडमध्येही मिळाली नाही संधी! इंग्लंडविरुद्धही प्रतीक्षा कायम
भारताच्या आयर्लंड दौऱ्यावर वैभव सूर्यवंशी प्रथमच वरिष्ठ संघासोबत होता. अनेकांना त्याचं आंतरराष्ट्रीय पदार्पण निश्चित वाटत होतं. मात्र दोन्ही सामन्यांत त्याला संधी मिळाली नाही. त्याऐवजी सूर्यांश शेडगे आणि प्रिन्स यादव यांनी टी-20 पदार्पण केलं. विशेष म्हणजे, त्या मालिकेत भारताला 0-2 असा पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यातही वैभवला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नाही. दुसरीकडे सलामीवीर संजू सॅमसन अवघ्या एका धावेवर बाद झाला. त्यामुळे आता आगामी सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता अधिक असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगू लागली आहे.
हे ही वाचा –