Last Updated:
Sangli News: “जास्त मोबाईल बघू नको, दहावीचं वर्ष आहे अभ्यास कर,” असं आईनं सांगितलं. मात्र, मुलीनं आईचं ऐकलं नाही.
सांगली: सध्याच्या काळात अनेक मुलं-मुली मोबाईलच्या आहारी गेल्याचं चित्र आहे. आता सांगलीतून एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. सतत मोबाईल बघणाऱ्या लेकीला आईनं ‘मोबाईल जास्त बघू नको, अभ्यास कर’ असं सांगितलं. यावर रागाच्या भरात दहावीत शिकणारी मुलगी घर सोडून निघून गेली. ती अल्पवयीन असल्याने तिचे अपहरण केल्याची फिर्याद विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सांगलीतील विश्रामबाग परिसरात एका कुटुंबातील मुलगी दहावीत शिकते. ती सतत मोबाईल बघत असल्यामुळे आई रागावली. “जास्त मोबाईल बघू नको, दहावीचं वर्ष आहे अभ्यास कर,” असं आईनं सांगितलं. मात्र, मुलीनं आईचं ऐकलं नाही. आई वारंवार तेच सांगत असल्याने मुलीला राग आला आणि तिनं रागाच्या भरात घर सोडले.
दहावीतील मुलगी 30 जून रोजी शाळेच्या दप्तरात कपडे भरून घरातून निघून गेली. त्यानंतर ती परतलीच नाही. कुटुंबीयांनी तिचा सगळीकडे शोध घेतला. मात्र, तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे आईने थेट विश्रामबाग पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून पोलीस मुलीचा शोध घेत आहेत.
Sangli,Maharashtra
Jul 02, 2026 10:39 AM IST
