जिंकलंस मित्रा ! धो धो पाऊस… अभिनेत्याचा लग्जरी कार वाटेतच सोडून मेट्रोने प्रवास, तोंडाला मास्क आणि… – Marathi News | Randeep Hooda Ditches Luxury Car for Mumbai Metro Amid Heavy Rains | Viral Video


प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुड्डाने अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये आपलं एक स्थान निर्माण केलं आहे. एक गुणी अभिनेता आणि डाऊन टू अर्थ स्वभावाचा अभिनेता म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जातं. आपल्या या आगळ्यावेगळ्या स्वभावामुळेच तो चाहत्यांचं मन जिंकत असतो. आज पुन्हा एकदा रणदीप चर्चेत आला. तो म्हणजे त्याच्या आगामी सिनेमामुळे नाही तर मुंबईच्या पावसामुळे. मुंबईच्या भर पावसात आपली अलिशान लग्जरी कार सोडून त्याने थेट मेट्रोने प्रवास केल्याने सर्वांनाच त्याच्या या स्वभावचं कौतुक वाटत आहे.

मुंबईत आज सकाळपासूनच धुवाँधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाणीच पाणी झालं होतं. त्यामुळे आज सकाळपासूनच वाहतूक कोंडी झाली होती. अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तास न् तास लोकांना रांगेमध्ये तिष्ठत बसावं लागलं होतं. रणदीप हु्ड्डाही या वाहतूक कोंडीत अडकला. वाहतूक कोंडीत बराच वेळ अडकावं लागणार असल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने आयडियाची कल्पना लढवली. त्यांने आपली महादडी कार वाटेतच सोडली. थेट मेट्रोत घुसला. तोंडाला मास्क लावून त्याने मेट्रोतून प्रवास केला. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

उशिर नको म्हणून…

रणदीप हुड्डा अंधेरी पूर्वला एका सिनेमाच्या शुटिंगसाठी गेला होता. काम संपल्यावर तो बाहेर आला. तेव्हा बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडी कधी सुटेल याची काही शाश्वती नव्हती. त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी आणि वेळेत घरी पोहोचण्यासाठी त्याने मेट्रोतून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. त्याने तोंडाला मास्क लावला. कोणी ओळखू नये याची खबरदारी घेतली. त्यानंतर तडक मेट्रो स्थानकात घुसला.

व्हिडीओ व्हायरल…

सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात रणदीप हुड्डा सामान्य प्रवाशाप्रमाणे प्रवास करताना दिसत आहे. त्याने ब्लॅक जीन्स, राखाडी टी शर्ट आणि वर चेक्ड शर्ट घातलेलं आहे. मेट्रोत कोचमध्ये उभं राहून तो प्रवास करताना दिसत आहे. या प्रवासात एका तरुणीसोबत तो गप्पा मारतानाही दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर मास्क लावलेलं आहे. त्यामुळे त्याला कुणीच ओळखलं नाही. त्यामुळे त्याला मेट्रोचा प्रवास सहज करता आला.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *