भूमिकांबद्दल बोलताना मीरा स्पष्ट शब्दांत सांगते, “मला टीव्हीवर पुन्हा यायचं आहे, पण एखाद्या वेंधळ्या किंवा मूर्ख मुलीची भूमिका मी आता करणार नाही. मला खलनायिका साकारायलाही आवडेल, कारण प्रेक्षकांनी मला त्याच रुपात जास्त स्वीकारलं आहे. पण ती भूमिका प्रभावी आणि खंबीर असायला हवी. जेव्हा मला अशी एखादी तगडी स्क्रिप्ट मिळेल, तेव्हाच मी होकार देईन. मी टीव्हीवर नक्कीच परतेन, पण एका बॉस लेडीच्या थाटात.”
