India VS England 1st T20 : भारत आणि इंग्लंड यांच्यात 1 जुलैपासून 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीला टीम इंडियाच्या जर्सीमध्ये पाहण्याची चाहत्यांची प्रतीक्षा अधिक वाढली आहे. मात्र, याच दरम्यान प्रिन्स यादव यालाही प्लेइंग-XI मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
प्रिन्स यादवने आयर्लंडविरुद्धच्या आपल्या पदार्पणाच्या (डेब्यू) सामन्यात अष्टपैलू कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याने गोलंदाजीत 3 विकेट्स घेतल्या होत्या, तर फलंदाजीला आल्यावर आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर शानदार षटकार ठोकला होता. पदार्पणाच्या सामन्यात इतकी उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर कोणत्याही खेळाडूला संघात कायम ठेवले जाते. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात संघ व्यवस्थापनाने रणनीती किंवा संघ संतुलनाचा विचार करून प्रिन्स यादवला प्लेइंग-11 खेळाडूंमध्ये स्थान दिलेले नाही. तसेच, युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला देखील खेळण्याची संधी न मिळाल्याने चाहते थोडे नाराज झाले आहेत.
इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग-11 : संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.
इंग्लंडची प्लेइंग XI : फिल सॉल्ट, जोस बटलर, हॅरी ब्रूक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, साकिब महमूद, आदिल रशीद, ल्यूक वूड.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला