या गाण्यात लिरिक्सच नाहीत, तरी 14 वर्षांनंतरही बनतायत हिट रील्स; यूट्यूबवर 5,900,000 मिलियन व्ह्यूज, ओळखलंत का? – Marathi News | Gangs of wasseypur title track tain tain to to still in trending after 14 years 5900000 Views on you tube


काही गाणी त्यांच्या लिरिक्समुळे प्रसिद्ध होतात, तर काही गाणी त्यांच्या सूर आणि तालामुळे प्रसिद्धीझोतात येतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, असं एक गाणं ज्यामध्ये एक ओळ काय एक शब्द देखील नाही, तरी देखील गाणं हिट ठरलं आहे. हे ऐकून तुम्हाला देखील आश्चर्य वाटलं असेल… पण 2012 मध्ये असं झालं. 2012 मध्ये असं एक गाणं प्रदर्शित झालं, ज्यामध्ये लिरिक्सच नव्हते.. पण ते गाणं सोशल मीडियावर आजही ट्रेंड करत आहे. सध्या ज्या गाण्याची चर्चा रंगली आहे, ते गाणं तुम्ही रिल्समध्ये नक्कीच ऐकलं असेल. पण तुम्हाला ओळखता येणार नाही, की हे गाणं नेमकं कोणतं गाणं आहे.

सध्या ज्या गाण्याची चर्चा रंगली आहे, ते गाणं प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा क्लासिक सिनेमा ‘गँग्स ऑफ वासेपूर’ सिनेमातील आहे… सिनेमातील हे गाणं 2012 मध्ये प्रदर्शित झालं असलं तरी, इन्स्टाग्राम रिल्स पासून मीम्सपर्यंत या गाण्याचा वापर होतो… या गाण्याचं ट्रॅकसध्या सर्वत्र तुफान चर्चेत आहे. सांगायचं झालं तर, अशा गाण्यांना ‘गीबरिश’ गाणं म्हणून ओळखलं जातं. म्हणजे अशी गाणी ज्यामध्ये असे शब्द असतात, ज्यांचा कोणताच अर्थ लागत नाही.

या विनोदी गाण्याचे लिरिक्स शोधण्याचा प्रयत्न केला तरी, ते मिळणं शक्य होणार नाही… या संपूर्ण गाण्यामध्ये फक्त तॅ तॅ, टू टू, तान तान… यांसारखे शब्द आहेत, ज्यांचा काहीच अर्थ नाही. पण तरी देखील गाणं हिट ठरलं आणि लोकांनी देखील गाण्याला डोक्यावर घेतलं. सिनेमात जेव्हा गँगस्टर्सचं टशन, गोळ्यांचा सीन काही अन्य सीन अधिक उत्तमरित्या दाखवण्यासाठी या गाण्यांचा वापर करण्यात आला.

स्नेहा खानवलकर

या गाण्याच्या प्रचंड यशामागील रहस्य देखील अतिशय रंजक आहे. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की, हे गाणं एखाद्या प्रोफेशनल गायिकेने गायलेलं नाही; सिनेमाच्या संगीत दिग्दर्शिका स्नेहा खानवलकर यांनीच यासाठी आपला आवाज दिला आहे. मुळात, गाण्याचे ताल तपासण्यासाठी स्नेहा केवळ एक ‘रफ डमी ट्रॅक’ रेकॉर्ड करत होत्या. मात्र, जेव्हा अनुराग कश्यप यांनी तो ‘डमी’ ऐकला, तेव्हा त्यांना तो इतका आवडला की, त्यांनी सिनेमात त्या ट्रॅकचा पूर्णपणे वापर केला आणि आजही हे गाणं ट्रेंड करत आहे.

गाणं होत आहे ट्रेंड



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *