10200 बॅटरी आणि मोटो पेन प्रो स्टायलससह नवीन टॅबलेट भारतात लाँच, जाणून घ्या त्यांची किंमत – Marathi News | New tablet with 10,200mAh battery and Moto Pen Pro stylus launched in India check the price


मोटोरोला कंपनीने त्यांचा मोटो पॅड 70 प्रो हा एक नवीन फ्लॅगशिप टॅबलेट भारतात लाँच केला आहे. तर हा लाँच झालेला नवीन टॅबलेट पॅन्टोन-क्युरेटेड रंगांच्या एकाच पर्यायात उपलब्ध असेल. प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये स्नॅपड्रॅगन ऑक्टा-कोर प्रोसेसर, ऑटोफोकससह एकच मागील कॅमेरा, मोठी 10,200mAh बॅटरी आणि डॉल्बी अॅटमॉस व क्वाड-स्पीकर सेटअपसाठी सपोर्ट यांचा समावेश आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या मोटो पॅड 70 प्रोची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

भारतात मोटो पॅड 70 प्रो ची किंमत

या नवीन मोटोरोला टॅबलेटची किंमत 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 36 हजार 999 रूपये आहे. तर 256GB व्हेरिएंटची किंमत 39 हजार 999 इतकी आहे. मोटोरोला स्नॅप-ऑन कीबोर्डची किंमत 45 हजा 999 आहे, तर स्वतंत्र कीबोर्डची किंमत 5 हजार 999 रूपये आहे.

हा टॅबलेट खरेदी करताना तुम्ही जर आयसीआयसीआय बँक कार्ड वापरून पेमेंट केल्यास 4 हजार रूपयांची त्वरित सूट देखील मिळेल. हा टॅबलेट 4 जुलै रोजी फ्लिपकार्ट आणि मोटोरोलाच्या वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. या किंमत श्रेणीमध्ये हा टॅब शाओमी पॅड 7, वनप्लस पॅड 2 आणि लेनोवो आयडिया टॅब प्लस सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करेल.

मोटो पॅड 70 प्रो फिचर्स

स्क्रीन: या टॅबमध्ये 13-इंचाचा 3.5K रिझोल्यूशनचा LCD टचस्क्रीन आहे जो 800 nits पीक ब्राइटनेस, 144Hz रिफ्रेश रेट, डॉल्बी व्हिजन आणि मोटो पेन प्रो (बॉक्समध्ये समाविष्ट) यांना सपोर्ट करतो.

ओएस: हा टॅब अँड्रॉइड 16 वर आधारित हॅलो यूआयवर चालतो. कंपनीने आश्वासन दिले आहे की या टॅबला अँड्रॉइड 18 पर्यंत ओएस अपग्रेड आणि चार वर्षांचे सुरक्षा अपडेट्स मिळतील.

चिपसेट: वेग आणि मल्टीटास्किंगसाठी या टॅबमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8s जेन 4 ऑक्टा-कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे.

रॅम आणि स्टोरेज: या टॅबलेटमध्ये 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज आहे, जे मायक्रो-एसडी कार्डद्वारे 2TB पर्यंत वाढवता येते.

कॅमेरा: यात ऑटोफोकससह एकच 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे. सेल्फीसाठी, 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. तसेच यात डॉल्बी अॅटमॉससह चार जेबीएल-ट्यून केलेले स्पीकर्स आणि ड्युअल-मायक्रोफोन सेटअप देखील आहे.

बॅटरी: फोनला पॉवर देण्यासाठी 10,200mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

कनेक्टिव्हिटी: यामध्ये वायरलेस कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ व्हर्जन 6 आणि वाय-फाय 7 चा सपोर्ट असेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *