साप्‍ताहिक आर्थिक राशिभविष्य 25 To 31 मे 2026: रूचकसह भद्र राजयोगाचा प्रभाव! मेष, वृषभ, कर्क, वृश्चिकची करिअरमध्ये प्रगती, लाभाचा योग! जाणून घ्या, तुमचे राशिभविष्य


Weekly Career Horoscope, 25 May To 31 May: मे महिन्याच्या या आठवड्यात रूचक राजयोगासह भद्र राजयोगाचा प्रभाव असेल. तेव्हा मेष, वृषभ, कर्क, वृश्चिकसह या राशींसाठी करिअरमध्ये प्रगती आणि आर्थिक बाबतीत यश आहे. मिथुन, तुळ, कुंभसह या राशींनी सावध राहावे तसेच कामात फोकस वाढवा. सिंह, कन्यासह या राशींसाठी नवीन संधी आणि प्रोजेक्टमध्ये प्रगती असेल. बहुतेक राशींसाठी आठवड्याच्या शेवटी प्रगतीचे योग आहेत. चला तर जाणून घेऊया ज्योतिषी, आध्यात्मिक गुरु नंदिता पांडे यांच्याकडून, हा आठवडा 12 राशींसाठी करिअर आणि आर्थिक बाबतीत कसा असेल? कोणत्या राशी भाग्यवान असतील, जाणून घेऊया या आठवड्याचे आर्थिक राशिभविष्य.

Weelkly Aarthik 25 To 31 May
Weekly Career Horoscope 25 May To 31 May : मे महिन्याच्या या आठवड्यात मंगळ मूलत्रिकोण राशी मेषमध्ये गोचर करत असल्यामुळे रूचक राजयोग तयार होत आहे. बुध ग्रहाचे संक्रमण मिथुन राशीत होत असल्यामुळे भद्र राजयोग देखील तयार होत आहे. तेव्हा मेषसाठी कामात यश मात्र खर्च वाढणार, कर्क राशीसाठी नोकरी-व्यवसायात प्रगतीचे योग, तुळने वादविवाद टाळावा, धनुसाठी करिअरमध्ये लाभदायक संधी, मकरचे कौतुक होणार, मीन राशीने खर्चावर नियंत्रण ठेवावे.चला तर, जाणून घेऊया तुमचा आठवडा कसा जाणार आहे? मेष ते मीन राशींसाठी साप्ताहिक आर्थिक आणि करिअर राशिभविष्य कसे असेल?

मेष साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य – कामात यश, खर्चात वाढ

मेष साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य - कामात यश, खर्चात वाढ

मेषसाठी या आठवड्यात प्रत्येक कामात यश असून मानसिक समाधान मिळेल. आर्थिक बाबतीत खर्च वाढू शकतात. घरात काही बदल होणार आहेत जे तुमच्यासाठी समाधानकार असून नवीन विचारसरणीसह पुढे वाटचाल कराल. प्रवासादरम्यान एखाद्या प्रभावशाली व्यक्तीकडून तुम्हाला मदत मिळेल. प्रेमसंबंधात सगळं काही ठीक आहे असे वाटेल पण काही गोष्टी त्रास देणार आहेत. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती ठिक असून तुम्ही रिलॅक्स फिल करणार आहात.

वृषभ साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य – प्रोजेक्टमध्ये यश

वृषभ साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य - प्रोजेक्टमध्ये यश

वृषभ राशीसाठी या आठवड्यात नोकरीत प्रगतीसह मान-सन्मान मिळण्याचे योग आहेत. तब्येतीत सुधारणा असून कामात उत्साह असेल. प्रोजेक्टच्या यशामुळे आनंद मिळेल. आर्थिक खर्च मात्र जास्त होऊ शकतो. मुलांबद्दल थोडी काळजी वाढण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध रोमँटिक असतील आणि एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेणार आहात. प्रवासातूनही समाधानकारक यश मिळेल, तसेच काही सुखद आठवणी तयार होतील. आठवड्याच्या शेवटी परिस्थितीत सुधारणा दिसून येईल.

मिथुन साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य – कामातील फोकस वाढवा

मिथुन साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य - कामातील फोकस वाढवा

मिथुन राशीसाठी या आठवड्यात सुखद वातावरण असेल. प्रवासाबाबत मनात थोडा संशय निर्माण होईल परंतु निर्धास्तपणे प्रवास केल्यास उत्तम यश आहे. तुम्ही सगळ्यांना व्यवस्थित समजून घेणार आहात. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादामुळे जीवनात प्रगती आणि सुखसमृद्धीचे योग आहेत. प्रेमसंबंधात दुरावा वाढू शकतो, त्यामुळे लवलाइफकडे खास लक्ष देणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी मन अस्थिर राहू शकते, खास करून तरुणवर्गाने कामातील फोकस वाढवायला हवा. आर्थिक बाबतीत वादविवाद टाळा. आठवड्याच्या शेवटी तुम्ही खूप व्यस्त राहणार आहात.

कर्क साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य – नोकरीत प्रगतीचे योग

कर्क साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य - नोकरीत प्रगतीचे योग

कर्कसाठी राशीसाठी या आठवड्यात नोकरी असो वा व्यवसाय प्रगतीचे योग आहेत. प्रोजेक्ट बाबत सकारात्मक बातमी मिळेल. आर्थिक बाबतीत उत्पन्न वाढेल, पण अपेक्षेपेक्षा कमी असेल. प्रेमसंबंध दृढ होतील आणि लव लाइफ रोमँटिक असेल. घरात शांतता आणि समाधान असेल. प्रियजनांसोबत पार्टी मूडमध्ये असणार आहात. या आठवड्यात प्रवास टाळणे उत्तम आहे. आठवड्याच्या शेवटी जास्त सतर्क राहा म्हणजे उत्तम परिणाम मिळतील.

सिंह साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य – सल्ला लाभदायक

सिंह साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य - सल्ला लाभदायक

सिंह राशीसाठी या आठवड्यात कामाच्या ठिकाणी थोडी जोखीम मोठा लाभ देवू शकते, यासाठी सल्ला मात्र आठवणीने घ्या. आर्थिक बाबतीत प्रगती असून अनपेक्षित लोकांकडून मदत मिळेल. प्रेमसंबंधात संयम ठेवाल तरच लवलाइफ रोमँटिक होईल. घरात वातावरण समाधानकारक असून मानसन्मान वाढेल. आठवड्यातील प्रवास यशस्वी होणार आहे, जरी अपेक्षेपेक्षा कमी फायदा असला तरी अनुभव वाढेल. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती अधिक चांगली असेल.

कन्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य – प्रतिष्ठा वाढणार

कन्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य - प्रतिष्ठा वाढणार

कन्या राशीसाठी या आठवड्यात नोकरी – व्यवसायात प्रगती असेल. प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील आणि प्रतिष्ठा वाढेल. वेळ तुमच्या बाजूने आहे असे समजा. प्रेमसंबंधात एखाद्या नव्या सुरुवातीबाबत मन खिन्न होऊ शकते. आठवड्याच्या मध्यवर्ती परिस्थितीत सुधारणा होईल. आर्थिक बाबतीत गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तब्येतीत सुधारणा होणार आहे. तसेच घरात वातावरण सुखसमाधानाचे असेल. या आठवड्यात प्रवास टाळणेच योग्य अन्यथा नुकसान होऊ शकते.आठवड्याच्या शेवटी व्यवसायाबाबत सकारात्मक बातमी मिळेल

तूळ साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य – वादविवादापासून दूर राहा

तूळ साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य - वादविवादापासून दूर राहा

तुळसाठी या आठवड्यात नोकरी असो वा व्यवसाय तुम्ही जे काम हाती घेणार ते वेळेत पूर्ण करणार आहात. तुमच्या प्रोजेक्टला यशस्वी बनवण्यात एखाद्या महिलेची मदत मिळेल. लवलाइफ रोमँटिक असणार आहे. आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा दिसून येईल. या आठवड्यात प्रवास टाळणे उत्तम आहे. वादविवादापासून दूर राहा. आठवड्याच्या शेवटी काही नवीन संपर्क होतील त्यामुळे करिअरमध्ये भविष्यात लाभ होणार आहेत.

वृश्चिक साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य – धनवृद्धीचे योग

वृश्चिक साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य - धनवृद्धीचे योग

वृश्चिकसाठी या आठवड्यात नोकरी- व्यवसायात भरभराट आहे. आर्थिक बाबतीत धनवृद्धीचे चांगले योग तयार होतील. आठवड्याच्या सुरुवातीलाच प्रोजेक्टसंबंधित एखादी चांगली बातमी मिळेल त्यामुळे आत्मविश्वास द्विगुणीत होईल. प्रवासाचा योग असून प्रवास सुखद असेल. कुटुंबासोबत एखादी नवीन सुरुवात करण्याचा विचार करणार आहात. त्यासाठी घरातील मंडळी पाठिंबा देतील. आठवड्याच्या शेवटी सुख-समृद्धीचे योग असून समाधान वाढेल.

धनु साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य – नवीन प्रोजेक्ट मिळणार

धनु साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य - नवीन प्रोजेक्ट मिळणार

धनु राशीसाठी या आठवड्यात व्यवसायात नफ्याचे योग आहेत. नोकरीत नवीन प्रोजेक्ट मिळणार आहेत. करिअरमध्ये एखाद्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तीची मदत मिळू शकते. तब्येतीत सुधारणा असून काम करण्यासाठी उत्साह जाणवेल. व्यवसायात कामानुसार नियोजन करणे उत्तम असेल. घरात मात्र थोडे मतभेद असतील, तुम्ही संयमाने वागा. आठवड्याच्या शेवटी मनात अनेक प्रश्न येतील तुम्ही शांत राहा आणि सकारात्मक विचार करा.

मकर साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य – गुंतवणुकीतून लाभाचे योग

मकर साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य - गुंतवणुकीतून लाभाचे योग

मकर राशीसाठी या आठवड्यात धनलाभाची प्रबळ शक्यता आहे. हा आठवडा तुमच्यासाठी उत्तम असून नोकरी असो वा व्यवसाय चांगली प्रगती होईल. नवीन प्रोजेक्टमुळे चांगलाच लाभ होईल तसेच वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. गुंतवणुकीतून लाभाचे योग आहेत फक्त नवीन गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. महत्त्वाचे कागदपत्र जपून ठेवा अन्यथा धावपळीची शक्यता आहे. लवलाइफ चांगले असून नातेसंबंध अधिक दृढ होतील. आठवड्याच्या शेवटी एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या आशीर्वादाने जीवनात सुखसमाधान येणार आहे.

कुंभ साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य – कठोर मेहनत, तर यश

कुंभ साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य - कठोर मेहनत, तर यश

कुंभ राशीसाठी या आठवड्यात आर्थिक बाबतीत उत्तम यश आहे. गुंतवणुकीतून मिळणारे यश दुप्पट आनंद देईल. नोकरी किंवा व्यवसायात काही वचन दिलं असेल तर ते पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल. प्रोजेक्टबद्दल मन अस्वस्थ राहील. कुटुंबात अनावश्यक वाद-विवाद टाळा, अन्यथा त्रासाची शक्यता आहे. प्रेमसंबंधात नाते अधिक मधुर होणार आहे. या आठवड्यात प्रवास टाळणे उत्तम आहे. आठवड्याच्या शेवटी अहंकाराला दूर ठेवा अन्यथा नुकसान होवू शकते.

_ (88)

_ (88)
अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा