पुणे जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. दौंड तालुक्यातील पाटस येथे भर दुपारी गोळीबार झाले आहे. तीन ते चार राऊंड फायर झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर पोलीस घटनास्थळी पोचलेले असून पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यासह पोलिसांची पथके चौकशी करत आहेत. श्रीगोंदा तालुक्यातून काही तरुण या ठिकाणी आले होते त्यांचा पाटस मधील तरुणांची शुल्लक कारणावरून वाद झाला आणि त्यानंतर फायरिंग झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
भर दुपारी गोळीबार
समोर आलेल्या माहितीनुसार, आज (शुक्रवार) दुपारी अडीच वाजता गोळीबार झाला आहे. यवतमधील गरदडे कॉम्प्लेक्समध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. किरकोळ वादातून ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. अहिल्यानंतर जिल्ह्यातील काष्टी येथून काही तरूण आले होते, त्यांचा स्थानिक तरुणांशी वाद झाला, त्यानंतर ही घटना घडली आहे.
किरकोळ वादातून राडा
यवतमधील या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील काही तरुण पाटस येथील गरदडे कॉम्प्लेक्समध्ये आले होते. यावेळी काष्टीतील या तरूणांचा पाटसमधील काही तरुणांशी वाद झाला. या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाले, त्यानंतर दगडफेकही झाली. यात एका चारचाकी वाहनाचे नुकसान झाले आहे. यानंतर 3-4 राऊड फायर करण्यात आले.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.