पार्थ पवारांच्या लग्नाची तारीख ठरली, बायको कायनात दार काश्मिरी नाही, त्या तर टीव्ही रिपोर्टर! कोण आहे सुनेत्रा पवारांची सून? | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

Parth Pawar Marriage Date: खासदार पार्थ पवार यांचा विवाह २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे संपन्न होणार आहे. त्यापूर्वी जुलै २०२६ या महिन्याच्या २९ तारखेला अत्यंत साध्या आणि कौटुंबिक वातावरणात त्यांचा साखरपुडा होणार आहे.

कायनात धार- पार्थ पवार
कायनात धार- पार्थ पवार

मुंबई : राष्ट्रवादीचे राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांनी कायनात दारा यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. खासदार पार्थ पवार यांचा विवाह २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे संपन्न होणार आहे. त्यापूर्वी जुलै २०२६ या महिन्याच्या २९ तारखेला अत्यंत साध्या आणि कौटुंबिक वातावरणात, मोजक्या नातेवाईकांच्या व फक्त निमंत्रित यांच्या उपस्थितीत साखरपुडा समारंभ पार पडणार आहे.

तसेच, पार्थ पवार यांच्या होणाऱ्या वधूचे नाव कायनात दारा असून त्या मूळच्या चंदीगड येथील आहेत व सध्या दिल्ली येथे वास्तव्यास आहेत. मागील काही दिवसांपासून माध्यमांमध्ये त्यांचे जन्म ठिकाण तसेच नावाच्या संदर्भात चुकीची, त्रुटीपूर्ण आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आल्याने पार्थ पवार यांच्याकडून कायनात यांच्याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

कोण आहेत कायनात दारा?

कायनात दारा या काश्मिरी असल्याचा उल्लेख अनेक माध्यमांनी केला आहे. मात्र त्या काश्मिरी नसून त्या पंजाबी आहेत. द ब्रिटीश स्कूल चाणक्यनगरी दिल्ली येथून त्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. राजधानी दिल्लीतील अत्यंत प्रतिष्ठित आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणसंस्थांपैकी ही एक संस्था मानली जात आहे. द लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले आहे.

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ही सामाजिक शास्त्रे, आंतरराष्ट्रीय संबंध, अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरण या क्षेत्रांतील जगातील अग्रगण्य विद्यापीठांपैकी एक मानली जाते.

कायनात दार यांचा व्यावसायिक अनुभव

उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी भारतातील अग्रगण्य इंग्रजी वृत्तवाहिन्यांपैकी एक असलेल्या NDTV या संस्थेत आऊटपूट एडिटर आणि रिपोर्टर म्हणून कार्य केले.

कायनात सध्या काय करतात?

सध्या त्या आपल्या कुटुंबाच्या Hospitality आणि Real Estate या व्यवसायामध्ये कार्यरत आहेत.

सार्वजनिक जीवनातील भूमिका

खासदार पार्थ अजित पवार यांच्या जीवनसाथी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिणी पवार यांच्या सून म्हणून त्या सार्वजनिक जीवनात प्रवेश करीत आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/

पार्थ पवारांच्या लग्नाची तारीख ठरली, बायको कायनात दार काश्मिरी नाही, त्या तर टीव्ही रिपोर्टर! कोण आहे सुनेत्रा पवारांची सून?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *