Last Updated:
नसरापूरच्या आरोपीला 55 दिवसातच आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे : नसरापूरच्या नराधमाला अखेर कोर्टाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्दयीपणे खून करण्यात आल्याच्या खटल्यात नराधम आरोपी भीमराव कांबळेला अखेर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आज झालेल्या सुनावणीत कोर्टाने हा महत्त्वाचं निकाल दिला आहे. 55 दिवसातच आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. तसेच संतोष देशमुख प्रकरणातही लवकरात लवकर न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.
नस रापूर प्रकरणातील नराधम आरोपीला फाशीची शिक्षा दिल्याने पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला आहे.. दरम्यान, पुणे सेशन्स कोर्टाने हा अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला आहे. अंतिम निकाल वाचनावेळी आरोपीला फाशीची शिक्षाही अपुरी असल्याचं कोर्टाने यावेळी स्पष्ट केलं. तसेच आरोपी फाशीच्या शिक्षेस पात्र आहे हा खटला हा दुर्मिळातला दुर्मिळ खटला असल्याचं महत्त्वाचं निरीक्षणही कोर्टाने नोंदवलं.
महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळाला : मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील म्हणाले, ममुख्यमंत्री साहेबांचे कौतुक केले पाहिजे, त्यांनी तत्परता दाखवली आणि दोन महिन्यांत आरोपीला शिक्षा झाली याच धर्तीवर संतोष देशमुख आणि मालेगाव येथील 3 वर्षीय मुलीच्या प्रकरणातही तत्काळ न्याय मिळायला हवा. नसरापूर प्रकरणात फाशीची शिक्षा झाल्याने पीडित कुटुंब आणि महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळाला आहे.
परळी पॅटर्न राबवून खोटे गुन्हे दाखल झाले का? जरांगेंचा सवाल
विलास घुले हत्या प्रकरणावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, खूप अवघड आणि सिरीयस विषय आहे. परळी पॅटर्न राबवून खोटे गुन्हे दाखल झाले का? याची संपूर्ण माहिती घेणार आहे. SIT ने याच्या मुळाशी गेले पाहिजे आणि चहूबाजूने चौकशी केली पाहिजे. घुले बंधूंना आणि कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास करायला लावणार असून, शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. SIT खोटा तपास करणार नाही.
शेतकरी कर्जमाफीवर जरांगे पाटील काय म्हणाले?
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, सरकार, बच्चू कडू आणि पवारांचे आंदोलन या सर्वांचा यात सहभाग आहे. मी शेतकऱ्यांसाठीच्या प्रत्येक आंदोलनात जातोच.
Mumbai,Maharashtra
नसरापूरच्या नराधमाला 55 दिवसात शिक्षा सुनावताच मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले संतोष देशमुख…
