गोविंदा आला रे आला… डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार


मुंबई : राज्यभरात दहीहंडी (Dahihandi 2026) उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे, गोविंदा रे गोपळा.. म्हणत तरुणाई थिरकत आहे. दहीकाला उत्सवाचा जल्लोष शिगेला पोहोचला असून दिग्गजांसह सेलिब्रिटींचीही मांदियाळी या दहीहंडी उत्सवात पाहायला मिळत आहे. बोरिवलीच्या मागठाणे इथे आमदार प्रकाश सुर्वे आणि राज सुर्वे यांच्यावतीने दहीहंडीच आयोजन करण्यात आलं आहे. येथील दहीहंडी उत्सवात मोठ्या प्रमाणात येत असून, सकाळपासून शेकडो मंडळांनी इथे उपस्थिती लावली असून अनेक सिने कलाकार देखील गोविंदांचा (Govinda) उत्साह वाढवण्यासाठी भेट दिली. अभिनेता गोविंदानेही येथील दहीहंडी उत्सवाला भेट देत डान्सही केला. 

गोविंदा आल्यानंतर दहीहंडी उत्सवातील उपस्थितांनी हात दाखवत जल्लोष केला. यावेळी, गोविंदाने चाहत्यांचे मनोरंजन करत दोन-तीन स्टाईलने डान्स केला. यावेळी, तुझको मिर्ची लगी तो मै क्या करू… या गाण्यावरील डान्स देखील गोविंदाने केल्याचं दिसून आलं. गोविंदासह अनेक मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांनी देखील येथील दहीहंडी उत्सवात उपस्थिती दर्शवली.  बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत देखील येथे आली होती, जलेबीबाई गाण्यावर मल्लिका शेरावत थिरकल्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. येथे सकाळपासून मागाठाण्याच्या देवीपाडा मैदानात आयोजित करण्यात आलेल्या दहीकाला उत्सवाला आलेली तरुणाई काही हलण्याच नाव घेत नाहीये, एकीकडे दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच दुसरीकडे एका मागोमाग येणाऱ्या सिने तारकांमुळे आणि नृत्यांच्या सादरीकरणामुळे तरुणांच्या उत्साहात भर पडताना दिसून येतेय

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील देवीपाडा मैदान, मागाठाणे बोरिवली येथील प्रकाश सुर्वेंच्या दहीहंडी उत्सवाला भेट देत नागरिकांशी, गोपाळ, गोविंदांशी संवाद साधला. यावेळी, एकनाथ शिंदेंसमोर गोविंदा पथकांनी उंचच उंच थर लावत आपली कलाकारी दाखवून दिली.  

दिवसभरात 118 गोविंदा जखमी

दरम्यान, दिवसभरात दहीहंडी उत्सवात एकूण 118 गोविंदा जखमी झाले असून यामधील पाच गोविंदा हे ऍडमिट करण्यात आले आहेत तर 80 गोविंदांवर उपचार सुरू आहेत तर 33 गोविंदांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

दरम्यान, ठाण्यातील मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृतीची दहीहंडी उत्सवात अनेक मंडळांनी थर लावून सलामी दिली. 

शिवगणेश गोविंदा पथक ९ थर लावले- संस्कृतीची दहीहंडी
रामनगर गोविंदा पथक -९थर -संस्कृतीची दहीहंडी ठाणे
सीपी तलाव राजा गोविंदा पथक- ९ थर -संस्कृतीची दहीहंडी ठाणे
अखिल मालपा गोविंदा पथक -९ थर संस्कृतीची ठाणे
यश गोविंदा पथक -९ थर- संस्कृतीची दहीहंडी

हेही वाचा

कुर्डूस गावातील विहिरीवरची दहीहंडी, तरुणाईचा उत्साह, गोविंदांची उंचच उंच उडी; जिल्ह्यातील नागरिकांचे आकर्षण



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *