कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; ‘भारत भाग्य विधाता’ का पाहावा?



Bharat Bhhagya Viddhaata Film: ‘आपलं काम रोगाशी लढायचं आहे,  रुग्णाशी नाही…’ हा डायलॉग ‘भारत भाग्य विधाता’ (Bharat Bhhagya Viddhaata) या सिनेमातला आहे. हा डायलॉग आपली आई मुलीला बोलते आणि सांगते की, डॉक्टर होण्यासाठी शिक्षण घे, नाहीतर नर्स होशील.   यानंतर सिनेमात एके ठिकाणी दहशतवादी हल्ला होतो.  तेव्हा एक नर्स, ‘जो कुणी श्वास घेत आहे, त्यांना आम्ही वाचवू’, म्हणजे यातून नर्सेसचं आपल्या देशात किती महत्त्व आहे, हे अधोरेखित होते.  मुंबईत 26/11चा (Film Review) दहशतवादी हल्ला आपल्या सर्वांना ठाऊक आहे.   या दहशतवादी हल्ल्याबाबत आपण खूप काही ऐकलं असेल.  इंडिया – पाकिस्तान, कसाब या नावांचा कायम उल्लेख होतो. पण नर्सेसचं का नाही? ‘भारत भाग्य विधाता’ या सिनेमातून 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात नर्सेस किती मोठं योगदान राहिलं आहे, याचं चित्रीकरण या सिनेमात करण्यात आलं आहे.

‘भारत भाग्य विधाता’ या सिनेमाची   कथा काय सांगते? (Kangana Ranauts Bharat Bhhagya Viddhaata Film Review)

मुंबईत 26/11 रोजी जेव्हा आतंकवादी हल्ला घडला,  तेव्हा कामा हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर नेहमीप्रमाणे उपचार सुरु होते. नर्सेस देखील आपआपलं काम करत होते. पण  तेव्हा कधी न विचार केलेली घटना घडली.  26/11च्या घटनेवेळीही रुग्णांना उपचारांची गरज होती. काहींना ऑक्सिजन सिलिंडर तर, कुणाची डिलिव्हरी होणार होती.  या दहशतवादी हल्ल्यात नर्सेसनं हॉस्पिटलमधील रुग्णांची कशी काळजी घेतली? दहशतवादी असूनही नर्सेसनं रुग्णांचं सरंक्षण कसं केलं? हेच या सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

‘भारत भाग्य विधाता’ हा सिनेमा आहे तरी कसा?

हृदयाला हेलावून टाकणार्‍या या सिनेमात रुग्णांकडून नर्सेसचा होणारा अपमान दाखवण्यात आला आहे. तरी देखील नर्सेस आपलं कर्तव्य विसरत नाहीत. ते अहोरात्र आपल्या रुग्णांची सेवा करतात.   या सिनेमात आपल्याला बरेच इमोशनल सीन्स पाहायला मिळतील. एका सीनमध्ये नर्सची भूमिका साकारणारी कंगना रणौत रुग्णाला औषध खाण्यास सांगते. पण रुग्ण तिचा अपमान करतो. ‘तू नर्स आहेस, तुला काय माहित, डॉक्टरांना बोलव’, असं तो कंगनाला म्हणतो.  जेव्हा डॉक्टर येतात तेव्हा तेच औषध रुग्णाला देतात.  ‘गीता (कंगना) असल्यावर अडचण काय?’ असं सिनिअर डॉक्टर म्हणतात. एवढं सगळं होऊनही नर्सला स्वत:च्या अपमानापेक्षा रुग्णाला औषध देण्याची जास्त काळजी असते.

या सिनेमात थेट मुद्दा दाखवण्यात आला आहे. या सिनेमातून नर्सेसचं जीवन दाखवण्यात आलं आहे. कुटुंबातील आजारी सदस्यांना मागे सोडून नर्सेस आपलं कर्तव्य बजावण्यासाठी रुग्णालयात जातात. त्यांची तारेवरची कसरत या सिनेमातून पाहायला मिळेल. हा सिनेमा पाहून तुमचा नर्सेस प्रति आदर आणखी वाढेल.

अॅक्टिंग

कंगना रणौतनं उत्तमरित्या गीता गंधारे या नर्सची भूमिका साकारली आहे. रुग्णांची काळजी घेणं असो किंवा आतंकवादी हल्ला, प्रत्येक फ्रेममध्ये कंगनाने जीव ओतून काम केलं आहे. गिरीजा ओक हिनं  देखील  उत्तम काम केलं आहे. तिचा खेळकर विनोदी अंदाज आपल्याला नक्की आवडेल. मराठी अभिनेत्री स्मिता तांबे हिनं देखील आपल्या भूमिकेत जीव ओतून काम केलं आहे.  ईशा डे हिनं देखील आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. तर, सुहिता थत्ते यांनी  सिनिअर नर्सची भूमिका साकारली आहे.  या सिनेमातील प्रत्येक कलाकारांनी आपल्या भूमिकांना उत्तमरित्या वठवलं आहे.   मुकेश छाबरानं या सिनेमाचं कास्टिंग केलं आहे. 

रायटिंग आणि डायरेक्शन

मनोज तपाडिया लिखित आणि दिग्दर्शित हा सिनेमा आपल्याला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.  या सिनेमातून नर्सेसचं कार्य उत्तमरित्या दाखवण्यात आलं आहे. या सिनेमातील काही सीन्स हे जबरदस्त आहेत. दहशतवादी हल्ल्याच्या एका सीनमध्ये नर्सेसच्या हातात बंदूक न देता, इंजेक्शन दाखवण्यात आलं आहे.  हा सीन पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.  हा सिनेमा सर्वांनी पाहावा असा आहे. 

रेटिंग – 4 स्टार्स.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

सागर कारंडेची विनोदी शैली की प्रेक्षकांना जोडा; भर नाट्यगृहात नाटकाला उशिरा आलेल्यांना टोला, व्हिडिओ चांगलाच व्हायरल



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *