YouTuber Madhumitha Case: आजकाल सोशल मीडियावर आपलं आयुष्य दाखवणं ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. हे सर्व कॅमेऱ्यात कैद होतं, पण कल्पना करा, तुम्ही दाखवत असलेलं आयुष्य जर कोणाच्या नजरेत आलं तर? तामिळनाडूच्या कन्याकुमारीमधील चोरीच्या एका घटनेमुळे हे प्रश्न निर्माण झाले आहेत. चोरांनी एका यूट्यूबर जोडप्याच्या घरात घुसून मागचा दरवाजा तोडला आणि कथितरित्या अंदाजे 944 ग्रॅम, आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला. हे घर नागरकोविलजवळील थम्मथुकोनमच्या व्हीआयपी गार्डन परिसरात आहे. यूट्यूबर मधुमिता याच परिसरात तिचा पती विनोद कुमारसोबत राहते. अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या वेळी घराच्या मागच्या बाजूने येऊन मागचा दरवाजा तोडला आणि घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरली. चोरीनंतर आरोपी फरार झाले.
आजूबाजूच्या परिसराची झडती घेण्यात आली
जेव्हा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली, तेव्हा राजाक्कमंगलम पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तपास सुरू झाला. घर आणि आजूबाजूच्या परिसराची झडती घेण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. आणि येथूनच या चोरीच्या कहाणीला एक नवीन पैलू जोडला गेला. आता पोलीस हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की चोर घरात कसे पोहोचले.
कंटेटमधून तिची आलिशान जीवनशैली दिसून येते
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, घरातून ११८ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. दक्षिण भारतात, सोन्याचे प्रमाण सांगण्यासाठी ‘सॉवरेन’ हा शब्द वापरला जातो. रोकडही चोरीला गेल्याचे वृत्त आहे. विनोद आणि पत्नी मधुमिता यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहेत आणि व्हिडिओ बनवतात. मधुमिताच्या सोशल मीडियावरील कंटेटमधून तिची आलिशान जीवनशैली दिसून येते. मिळालेल्या माहितीनुसार, तिच्या व्हिडिओ आणि पोस्टमध्ये सोन्याचे दागिने आणि रोकडही दिसत आहे. या पोस्ट किंवा व्हिडिओमधून घरातील मौल्यवान वस्तूंविषयी काही माहिती मिळाली आहे का, याचा तपास पोलीस आता करत आहेत.
आरोपींना ओळखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या येण्या-जाण्याच्या मार्गांचा शोध घेतला जात आहे. जवळपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासले जात आहे. घरात एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने ठेवल्याची कोणाला माहिती होती का, याचाही पोलीस तपास करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?