Surya Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी


Surya Nakshatra Parivartan 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, आत्मा, मान-सन्मान आणि नेतृत्वाचा कारक ग्रह सूर्याला मानण्यात आलं आहे. सूर्य देव 17 ऑगस्ट रोजी सकाळी केतूच्या स्वामित्व असणाऱ्या मघा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. सूर्याचं हे नक्षत्र परिवर्तन सकाळी 8 वाजून 3 मिनिटांनी होणार आहे. सूर्य देव 31 ऑगस्टपर्यंत मघा नक्षत्रात संक्रमण करणार आहे. 

मघा नक्षत्राचा संबंध पिता, सत्ता आणि राजसी सुखाशी संबंधित आहे. या नक्षत्राचा स्वामी ग्रह केतू आहे. केतू हे मोक्षाचं प्रतीक आहे. त्यामुळे सिंह राशीत सूर्याचं आपल्याच नक्षत्रात येणं फार प्रभावशाली ठरणार आहे. यामुळे कोणकोणत्या राशींचं भाग्य उजळणार आहे ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. सूर्य आणि मंगळ यांच्यामध्ये मैत्रीभाव आहे.  हे नक्षत्र परिवर्तन या राशीच्या पंचम भावात होणार आहे. या काळात नोकरदार वर्गातील लोकांना नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात तुम्हाला नवीन कल्पना सुचतील. तसेच, वडिलोत्पार्जित संपत्तीचा तुम्ही चांगला लाभ घ्याल. 

सिंह रास (Leo Horoscope)

मघा नक्षत्र सिंह राशीच्या अंतर्गतच येतं. त्यामुळे सूर्याचं हे नक्षत्र परिवर्तन या राशीसाठी सर्वात फलदायी ठरणार आहे. या काळात समाजात तसेच, कामाच्या ठिकाणी तुमचं वर्चस्व टिकून राहील. तुमच्यातील नेतृत्व क्षमता चांगली दिसून येईल. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी केतूच्या नक्षत्रात सूर्याचं संक्रमण नशिबाची साथ देणार आहे. या काळात अनेत दिवसांपासून रखडलेली तुमची कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. तसेच, मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. मित्रांच्या सहवासाने तुम्हाला चांगले कार्य करता येतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या :                                                                                                   

Shani Nakshatra Parivartan 2026 : शनिचं नक्षत्र परिवर्तन परिवर्तन अवघ्या काही दिवसांवर…12 पैकी 3 राशींना धोक्याचे संकेत, दिवसेंदिवस टेन्शन वाढणार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *