Shravan 2026: श्रावणातला शेवटचा सोमवार दुर्मिळ! खूप वर्षांनी अद्भूत योगायोग जुळला, शिवपूजेचा मुहूर्त, शिवामूठ कोणती? धार्मिक महत्त्व…


Shravan 2026: सध्या श्रावण महिना सुरू आहे, आणि श्रावण महिना हा भगवान शिवाला समर्पित मानला जातो आणि या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी विशेष शिवपूजा करण्याची परंपरा आहे. त्यामुळे श्रावणी सोमवारला हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्त्व आहे. वैदिक पंचांग आणि ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा श्रावणातील शेवटचा सोमवार अत्यंत खास आहे, कारण या दिवशी एक दुर्मिळ असा शुभ योग जुळून येतोय, ज्यामुळे त्याचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. यंदा शेवटचा श्रावणी सोमवार कधी? या दिवशी कोणते शुभ योग जुळून येत आहेत? याचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या…

शेवटचा श्रावणी सोमवार कधी? (Shravan Somvar 2026)

महाराष्ट्रातील अमांत पंचांगानुसार 2026 मधील शेवटचा श्रावणी सोमवार 7 सप्टेंबर 2026 रोजी आहे. यंदा श्रावणातील सोमवार 17 ऑगस्ट, 24 ऑगस्ट, 31 ऑगस्ट आणि 7 सप्टेंबर असे चार आहेत. त्यामुळे 7 सप्टेंबर हा यंदाचा चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवार ठरतो.

या दिवशी कोणते शुभ योग आहेत?

वैदिक पंचांगानुसार, 7 सप्टेंबर रोजी श्रावणी सोमवारसोबत अजा एकादशीही आहे, त्यामुळे हा दिवस धार्मिकदृष्ट्या आणखी महत्त्वाचा मानला जातो. कृष्ण पक्षातील एकादशी तिथी असून ती सायंकाळी 5:04 पर्यंत आहे. विशेष म्हणजे 7 सप्टेंबरला पुनर्वसू नक्षत्र सायंकाळी 6:14 पर्यंत आहे. पंचांगानुसार सकाळी 6:40 पर्यंत व्यतीपात योग असून त्यानंतर वरियान योग सुरू होतो. या दिवशी अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 ते 12:57 दरम्यान आहे. तसेच पंचांगानुसार संध्याकाळी 6:44 ते 8:14 दरम्यान प्रदोषकाळ आहे. नवीन शुभकार्य सुरू करण्यासाठी राहुकाळ टाळण्याची परंपरा आहे.

शेवटच्या श्रावणी सोमवारी शिवमूठ कोणती आहे?

महाराष्ट्र आणि कोकणातील परंपरेनुसार श्रावणी सोमवारी भगवान शिवाला शिवामूठ अर्पण करण्याची प्रथा आहे. 2026 मध्ये शेवटच्या म्हणजे 7 सप्टेंबरच्या श्रावणी सोमवारी जवस शिवमूठ म्हणून अर्पण केले जाईल.

श्रावणी सोमवारचे धार्मिक महत्त्व

श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित मानला जातो. त्यामुळे या महिन्यातील सोमवारी उपवास, शिवलिंगाला जल किंवा पंचामृताने अभिषेक, बेलपत्र अर्पण आणि शिवपूजन करण्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. श्रद्धेनुसार श्रावणी सोमवारचे व्रत केल्याने भगवान शिवाची कृपा मिळते आणि मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता आहे.

हेही वाचा :

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 4 राशींच्या भाग्योदयाला अखेर सुरूवात! सप्टेंबरचा पहिलाच आठवडा पॉवरफुल, साप्ताहिक राशीभविष्य..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *