Shani Gochar 2026 : शनिचं बॅक टू बॅक संक्रमण! 2026 वर्षाच्या शेवटी तब्बल 4 वेळा चालीत होणार बदल, ‘या’ 4 राशींवर होणार पैशांची छप्परफाड कमाई


Shani Gochar 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनिला (Shani Dev) न्यायदेवता म्हणतात. असं म्हणतात शनिच्या चालीत होणारा छोटा-मोठा बदल सर्व 12 राशींच्या जीवनावर परिणाम करतो. 2026 वर्षातील जुलै ते डिसेंबरपर्यंतचा काळ ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असणार आहे. या काळात शनिजेव आपल्या चालीत, स्थितीत आणि नक्षत्रात 4 मोठे बदल करणार आहे. शनिच्या या बदलत्या चालीचा परिणाम काही भाग्यशाली राशींवर (Zodiac Signs) होणार आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार, डिसेंबरपर्यंत कधी शनि आपली चाल बदलणार आणि याचा परिणाम कोणत्या राशींवर होणार आहे ते जाणून घेऊयात. 

शनिच्या बदलाचे ‘या’ 4 मोठ्या तारखा 

2 जुलै 2026 – शनि नक्षत्र परिवर्तन 

जुलै महिन्याच्या सुरुवातीला शनि देव बुध ग्रहाच्या नक्षत्रात म्हणजेच रेवती नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करणार आहे. 

27 जुलै 2026 – शनिची वक्री चाल 

या कालावधीत शनि देव मीन राशीत स्थित असून आपली उलटी चाल चालणार आहे. हा काळ साधारण 138 दिवसांचा असणार आहे. या काळात शनि राशींना आपल्या कर्मानुसार फळ देतील. 

9 ऑक्टोबर 2026 – शनिचं नक्षत्रात पुनरागमन 

उलटी चाल चालताच शनि देव रेवती नक्षत्रातून मागे फिरतील. त्यानंतर शनि देव उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करतील. 

11 डिसेंबर 2026 – शनिची मार्गी चाल 

2026 वर्षाच्या शेवटी शनिची वक्री चाल संपणार आहे. त्यानंतर शनि पुन्हा सरळ म्हणजेच मार्गी चाल चालतील. या काळात तुमची रखडलेली कामे वेगाने होतील. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांनी शनिची ही चाल तुमच्यासाठी प्रगतीचे अनेक मार्ग खुले करतील. नोकरदार वर्गातील लोकांच्या पदोन्नतीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ नव्या उमेदीचा असणार आहे. या काळात रोजगाराच्या संधीत असलेल्या तरुणांना चांगली नोकरी मिळेल. तसेच, तुम्हाला या कालावधीत शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. करिअरच्या बाबतीत तुम्हाला चांगल्या संधी मिळतील. कामाच्या निमित्ताने तुमचे संपर्क वाढतील. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगले बदल दिसून येतील. तसेच, तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. तुमच्या व्यवसायात प्रगतीचे अनेक संकेत मिळतील. तसेच, परदेशात जाण्याची संधी निर्माण होईल. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ भाग्यशाली असणार आहे. या काळात तुम्हाला व्यवसायात एक मोठी डील मिळू शकते. धनलाभाचे योग जुळून येणार आहे. तसेच, तुमच्या जुन्या कर्जातून मुक्ती होईल. तुमचा आर्थिक तणाव दूर होईल. तसेच, घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Horoscope Today 27 May 2026 : आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य

 

 

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *