Salman Khan on ABP Network: बॉलिवूडचा (Bollywood) भाईजान सलमान खान (Salman khan) सध्या आपल्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. ‘मातृभूमी’ (Matrubhumi) असे त्याच्या आगामी सिनेमाचे नाव असून, या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री चित्रांगदा सिंगही (Chitrangda) झळकणार आहे. अलिकडेच सलमान खानने (Salman Khan) एबीपी नेटवर्कच्या ‘राइजिंग समिट 2026’मध्ये हजेरी लावली. मुलाखतीत सलमान खानने विविध विषयांवर चर्चा केली. सलमान खानने आपल्या कारकिर्दीत बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलं आहे. भाईजानचा मोठा चाहतावर्ग आहे. या मुलाखती दरम्यान, दंबग खानने स्वत:ला अभिनेता नसल्याचं सांगितलं. सलमान खान नेमकं काय म्हणाला? पाहूयात.
सलमान खान अभिनेता नाही तर नशीब आहे…(Actor Salman Khan Says He Is Not an Actor but Destiny)
सलमान खान सध्या ‘मातृभूमी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. Apoorva Lakhia दिग्दर्शित हा सिनेमा 4 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. तर, श्रद्धा कपूरचा ‘ईठा’ हा सिनेमा देखील 4 डिसेंबर रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे. दोन्ही सिनेमांचा एकाच दिवशी सिनेमागृहात क्लॅश होणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सध्या सलमान खान व्यस्त आहे. सलमान खानने आपल्या कारकिर्दीत केवळ हिंदी नाही तर, मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. सलमान खान असा अभिनेता आहे, ज्याच्या 18 सिनेमांनी 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. सोशल मीडियावर त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. सलमान खान कायम ट्रेंडवर असतो.
सलमान खानने एबीपी नेटवर्कला देत असलेल्या मुलाखतीत स्वत:ला अभिनेता नसल्याचं म्हटलं आहे. सलमान खान म्हणाला की, ‘सलमान खान अभिनेता नाही आहे. तो एक नशीब आहे (तकदीर, Destiny)’, असं म्हणतो. यानंतर मुलाखतकार , ‘सलमान खान हे नशीबाचेच दुसरे नाव आहे. बरं झालं असतं जर, हे नशीब प्रत्येकाला मिळाले असते’, असं म्हणते. तेव्हा सलमान खान म्हणतो, ‘हो. माझ्यासाठी तर आहे. ज्या घरात माझा जन्म झाला. जिथे मी वाढलो. त्यांनी (सलमान खानचे वडील) माझ्याहून अधिक मेहनत घेतली आहे. इंदौरहून आले, तेव्हा त्यांच्याकडे केवळ 60 रुपये होते. आपलं नाव कमावलं. माझ्या आईशी लग्न केलं. आणि आता मी तुमच्यासमोर उभा आहे’, असं सलमान खान म्हणाला.
‘माझे यात काहीच योगदान नाही. हा पण एक योगदान आहे, ते म्हणजे बिघडवण्याच्या प्रक्रियेत..’, असं सलमान खान म्हणाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या: