Rekha Fitness Transformation:’रेखा आधी जाड होती, पण नंतर..’ रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..


Rekha Fitness Transformation: बॉलिवूडमध्ये काही चेहरे असे आहेत, ज्यांचं सौंदर्य पाहून आजची पिढीही थक्क होते. त्यापैकी एक नाव म्हणजे अभिनेत्री रेखा (Rekha). अनेक वर्षं उलटली, काळ बदलला, पण रेखा यांच्या सौंदर्याची जादू आजही कायम आहे. त्यांचा साडीतील लूक असो, डोळ्यांमधली तीच काळजाचा ठाव घेणारी नजर असो किंवा त्यांचा तो खास अंदाज… अभिनेत्री रेखा आजही तितक्याच ग्लॅमरस दिसतात. पण तुम्हाला माहितीये का, आज ज्या रेखांना पाहून सगळे कौतुक करतात, त्या इंडस्ट्रीत आल्या तेव्हा त्यांचा लूक अगदी वेगळा होता. स्वतःवर मेहनत घेत त्यांनी केलेला हा बदल थक्क करणारा आहे. रेखाचे भावोजी आणि अभिनेते तेज सप्रू यांनी नुकतंच त्यांच्या या ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा सांगितला आहे. रेखानी स्वतःला ज्या पद्धतीने बदललं, त्याचं कौतुक करताना तेज यांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, रेखानी स्वतःवर प्रचंड मेहनत घेतल्याचं सांगितलं.

‘सुरुवातीला रेखा जाड होत्या…’

‘Rediff Originals’च्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तेज सप्रू म्हणाले, “जेव्हा रेखानी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली, तेव्हा ती जाड होती. हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्यानंतर तिने स्वतःला ज्या पद्धतीने ग्रूम केलं, ते खरंच कौतुकास्पद आहे.रेखानी केवळ वजन कमी केलं नाही, तर स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर, स्टाइलवर आणि एकूणच लूकवर खूप मेहनत घेतली. “एक अभिनेत्री म्हणून तिने स्वतःला ज्या पद्धतीने ग्रूम केलं, तसं कदाचित दुसरं कोणी करू शकणार नाही. याचं संपूर्ण श्रेय मी तिलाच देतो,” असं ते म्हणाले.

आजच्या रेखाला पाहून तेज सप्रू भारावले

रेखा यांना नुकतंच तेज सप्रू यांनी ‘इंडियन आयडल’मध्ये पाहिलं. त्यांचा लूक आणि ग्रेस पाहून ते अक्षरशः भारावून गेलेले. ते म्हणाले “मी नुकतंच तिला ‘इंडियन आयडल’मध्ये पाहिलं. तिच्यातली ग्रेस कमाल आहे. ती एक जबरदस्त गायिकाही आहे. ती अगदी नोट्स किंवा पत्र लिहिते, तेव्हाचं तिचं हस्ताक्षरही खूप सुंदर आहे. मी आजपर्यंत असं हस्ताक्षर कोणाचं पाहिलं नाही,” असं तेज यांनी सांगितलं.

रेखांनीही सांगितलं होतं स्वतःला बदलण्यामागचं कारण

रेखांच्या या ट्रान्सफॉर्मेशनची चर्चा आज होतेय असं नाही. 1980च्या दशकात सिमी गरेवाल यांना दिलेल्या एका मुलाखतीत खुद्द रेखांनी त्यांच्या बदलाबद्दल भाष्य केलं होतं. सुंदर दिसण्यासाठी आणि एक परिपूर्ण महिला होण्यासाठी शारीरिकदृष्ट्या फिट असणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे रेखांनी स्वतःच्या फिटनेसवरही विशेष लक्ष दिलं.

कोण आहेत तेज सप्रू?

रेखा आणि तेज सप्रू यांचं नातंही थोडं खास आहे. तेज यांनी 1987 मध्ये रेखांच्या सावत्र बहिणी धनलक्ष्मी यांच्याशी लग्न केलं. पण त्याआधीपासूनच रेखा त्यांच्यासाठी बहिणीसारख्या होत्या. इतकंच नाही तर रेखा त्यांना जवळपास राखीही बांधायच्या, असा मजेशीर किस्सा तेज यांनी सांगितला. धनलक्ष्मी या अभिनेत्री पुष्पवल्ली आणि सिनेमॅटोग्राफर के. प्रकाश यांच्या मुलगी आहेत. तर रेखा या पुष्पवल्ली आणि अभिनेते जेमिनी गणेशन यांच्या मुलगी आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *