Rahul Gandhi and PM Modi: राहुल गांधींच्या छात्रो की गूंजमध्ये पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, स्टँडअप कॉमेडियन पुलकित मणीने काय केलं?


Rahul Gandhi and PM Modi: काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मध्य प्रदेशातील इंदूर येथे आयोजित ‘छात्रों की गूंज’ (Chhatron Ki Goonj) या विशेष कार्यक्रमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात त्यांनी शिक्षण व्यवस्था, लोकशाही, पेपरफुटी आणि रोजगाराच्या मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. मात्र, या संपूर्ण कार्यक्रमात सर्वात जास्त चर्चा रंगली ती मंचावरून झालेली पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची मिमिक्री (Mimicry) आणि कॉमेडियन पुलकित मणी (Pulkit Mani) यांच्या सादरीकरणाची. राहुल गांधी मंचावर उपस्थित असतानाच स्टँडअप कॉमेडियन पुलकित मणी याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलण्याच्या आणि वागण्याच्या पद्धतीची नक्कल केली.

Pulkit Mani: पुलकित मणीने मंचावर काय केलं?

कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी यांनी पुलकित मणीसोबत मंच शेअर केला. या वेळी पुलकितने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गाजलेल्या ‘माय फ्रेंड’ या वाक्याचा, परदेशी नेत्यांना मिठी मारण्याच्या त्यांच्या खास शैलीचा आणि लहान मुलांसोबत नाण्यांची ट्रिक दाखवण्याच्या प्रकारांची नक्कल केली. विशेष म्हणजे, पुलकित मणीच्या अशाच एका कॉमेडी ॲक्टची रील मार्च महिन्यात भारतामध्ये ब्लॉक करण्यात आली होती. इंदूरमधील मंचावर पुलकित जेव्हा ही मिमिक्री सादर करत होता, तेव्हा राहुल गांधी स्वतः हसून या कॉमेडी शोचा आनंद घेताना दिसले. सध्या या सादरीकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

v

Rahul Gandhi: “व्यवस्थेला विद्यार्थ्यांऐवजी ‘अंधभक्त’ हवे असतात”: राहुल गांधी

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी ‘अंधभक्त’ या शब्दाचा थेट उल्लेख करत व्यवस्थेच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “देशातील सध्याच्या व्यवस्थेला प्रश्न विचारणारे विद्यार्थी नको आहेत, तर डोळे झाकून सर्वकाही स्वीकारणारे ‘अंधभक्त’ हवे आहेत. विद्यार्थी नेहमी जिज्ञासू असतात आणि प्रश्न विचारतात; म्हणूनच ही व्यवस्था विद्यार्थ्यांना स्वतःसाठी धोका मानते.” राहुल गांधी यांनी या वेळी न्यायपालिका, शासकीय संस्था आणि निवडणूक आयोग यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. विद्यार्थी कोणतीही गोष्ट मूकपणे स्वीकारत नाहीत, तर संस्था आपली कर्तव्ये योग्य प्रकारे का पार पाडत नाहीत? असा थेट सवाल विचारतात, असेही त्यांनी नमूद केले.

Rahul Gandhi: विद्यार्थी विरुद्ध ‘अंधभक्त’ मानसिकता

राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांची तुलना करताना सांगितले की, विद्यार्थी हा प्रेम, आदर आणि नम्रता यांचा प्रतीक असतो. तो इतरांचे म्हणणे ऐकून घेतो, प्रश्न विचारतो आणि महिलांचा आदर करतो. ही मानसिकता द्वेष, अहंकार आणि भीती यावर आधारित असते. ही मानसिकता कशावरही प्रश्न विचारत नाही आणि महिलांचा अनादर करण्यास वाव देते.

Rahul Gandhi: पेपरफुटी, आरोग्य आणि नोकऱ्यांच्या मुद्द्यांवर चर्चा

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही मंचावरून आपल्या समस्या मांडल्या. एका विद्यार्थ्याने सरकारी भरती प्रक्रियेतील पारदर्शकता, पेपरफुटी आणि रिक्त पदे न भरल्याबद्दल तक्रार केली. प्रश्न विचारणाऱ्या तरुणांवर कायदेशीर खटले दाखल करून त्यांना तुरुंगात टाकले जात असल्याचा गंभीर आरोपही विद्यार्थ्यांनी केला. तसेच आदिवासी भागातील वसतिगृहांची दयनीय अवस्था आणि आरोग्य सुविधांचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या या सर्व मुद्द्यांचे समर्थन करत, शिक्षण ते रोजगार या प्रवासातील तरुणांचा आवाज दाबता कामा नये, यावर विशेष भर दिला.

आणखी वाचा 

Ketan Agrawal Case: आधी अपंग करण्याचा प्लॅन, नंतर ‘माही’ नावाचं फेक अकाउंट, चॅट जीपीटी अन् तो सिनेमा…; केतन अग्रवाल प्रकरणात 5,053 पानांच्या चार्जशीटमधून चक्रावणारे खुलासे





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *