Rahul Gandhi : अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन, नेमकं प्रकरण काय?


नवी दिल्ली: अभिनेत्री क्रिती सॅनन (Kriti Sanon) हिनं एका प्रसिद्ध दागिन्यांच्या ब्रँडसाठी जाहिराती केली होती. या जाहिरातीत क्रितीच्या पेहरावावरून भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) क्रितीला सोशल मीडियातून चांगलंच सुनावलं. कंगनाच्या या पोस्टनंतर क्रितीनंही तिला सडेतोड उत्तर दिलेलं. आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी क्रिती सॅननला पाठिंबा दिला आहे. 

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचं क्रिती सॅननला समर्थन

राहुल गांधी यांनी इन्स्टाग्रामवर क्रिती सॅननच्या स्टोरीला रिपोस्ट करत म्हटलं की,” एक महिला काय पेहराव करते, क्या करते आणि कुठे जाते ही तिची आवड आहे. महिलांना आपल्या स्वातत्र्यांचा उपयोग केल्यानं ट्रोल करणं बंद करा.” राहुल गांधी यांनी यावेळी पुण्यातील छात्रों की गुंज या कार्यक्रमात जे सूत्र वापरलं होतं किंवा ज्यानं त्या कार्यक्रमाचा शेवट केला होता ती टॅगलाईन या स्टोरीत हॅशटॅग म्हणून वापरत स्मॅश द पॅट्रियार्की असं म्हटलं. 
 

Rahul Gandhi : अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन, नेमकं प्रकरण काय?
रक्षाबंधनानिमित्त एका जाहिरातीमधील अभिनेत्री क्रिती सॅनन हिला तिनं केलेल्या पेहरावावरुन ऑनलाइन टीकेचा सामना करावा लागला होता. क्रिती सॅननं हिला त्या जाहिरातीमध्ये इंडो वेस्टर्न लूक मुळं टीकेचा सामना करावा लागला होता. इतकंच नाही भाजपच्या खासदार आणि बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत हिनं देखील क्रिती सॅनन हिच्यावर नाव न घेता टीका केली होती.  

“आजच्या महिलांकडे साडी, लेहेंगा, जीन्स असे कपड्यांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मग अशा वेळी तुम्ही तुमच्या भावाला बिकिनी किंवा अंतर्वस्त्रांमध्ये राखी का बांधाल?” अशी टीका कंगना रणौत हिनं केली होती. या टीकेला क्रिती सॅननं हिने  “महिलांनी काय कपडे घालावे हे सांगणं आपण कधी थांबवणार आहोत? संस्कृती आणि परंपरांविषयीचा आदर हा स्त्रीच्या मनात असतो, तिच्या कपड्यांच्या डिझाईनमध्ये नाही.” अशा शब्दांमध्ये उत्तर दिलं.  

अभिनेत्री क्रिती सॅनन हिनं इन्स्टाग्रामवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की सणांचा अर्थ तुम्ही केलेल्या पेहरावात नसतो, तर तो त्या परंपरांच्या प्रति असणाऱ्या भावनांमध्ये, त्याच्या महत्त्वात आहे. रक्षाबंधनाचा उत्सव हा सुरक्षेचा आणि प्रेमाच्या नात्याचा प्रतिक आहे. मी आणि माझी एकमेकांना राखी बांधते आणि एकमेकांची सुरक्षा, चांगलं आरोग्य, आनंद आणि दीर्घ आयुष्याची प्रार्थना करतो. माझ्यासाठी  हे प्रेम, प्रार्थना आणि एकमेकांची काळजी घेण्याचं नातं आमच्या घरातील डॉग्ज पर्यंत पोहोचतं, असंही क्रितीनं म्हटलं.  

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *