पिंपरी : पिंपरी-चिंचवडजवळील देहूगाव परिसरात काल (रविवारी, ता २०) एका भयंकर आणि थरारक घटनेने परिसर हादरून (Pune Crime News) गेला आहे. कौटुंबिक वादाच्या रागातून एका आयटी इंजिनिअर पतीने आपल्या पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिचा निर्घृणपणे खून केला. यानंतर त्याने स्वतःवरही शस्त्राने (Pune Crime News) वार करत दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना रविवारी (दि. २०) सकाळी पावणेसहाच्या सुमारास देहूगावातील ओमकार सोसायटीत (Pune Crime News) उघडकीस आली. या घटनेत शुभांगी आकाश बारस्कर (वय २८, रा. देहूगाव, ता. हवेली) असे मृत महिलेचे नाव आहे. तर तिचा पती आकाश रामदास बारस्कर (वय २६, रा. देहूगाव) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.(Pune Crime News)
Pune Crime News: गस्तीवरील पोलिसांमुळे घटना आली उघडकीस
देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी गस्तीवर असलेल्या पोलिसांना ओमकार सोसायटी परिसरात एका व्यक्तीला मारहाण झाल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस जेव्हा घटनास्थळी पोहोचले, तेव्हा आकाश बारस्कर हा रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पोलिसांना आढळला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील त्याच्या खोलीत जाऊन पाहणी केली असता, त्याची पत्नी शुभांगी ही गंभीर जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी वेळेचा विलंब न लावता दोघांनाही तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून शुभांगी हिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
Pune Crime News: वर्षभरापासून सुरू होता वाद
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आकाश हा आयटी इंजिनिअर असून हिंजवडी येथील नामांकित आयटी पार्कमधील एका कंपनीत नोकरीला आहे, तर मृत शुभांगी ही देखील एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. या दोघांचा विवाह डिसेंबर २०२३ मध्ये झाला होता. विवाह झाल्यापासून, म्हणजेच गेल्या वर्षभरापासून त्यांच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून कौटुंबिक वाद सुरू होते. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून ते देहूगावातील ओमकार सोसायटीत भाड्याने राहण्यासाठी आले होते. रविवारी सकाळी याच कौटुंबिक वादाचा भयंकर उद्रेक झाला. याच रागातून आकाशने शुभांगीवर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आकाशने स्वतःवरही शस्त्राने वार केले आणि घराच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली उडी मारली.
Pune Crime News: पोलिसांकडून सखोल तपास सुरू
पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात शुभांगीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन (Post-Mortem) करण्यात आले असून, त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. गंभीर जखमी असलेल्या आकाशवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या घटनेमुळे देहूगाव व पिंपरी परिसरात मोठी खळबळ उडाली असून, देहूरोड पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी अधिक सखोल तपास करत आहेत.