Pakistan squads for Asia Cup and Asian Games : टीम इंडियानंतर पाकिस्तान महिला संघाची घोषणा! आशिया कप अन् एशियन गेम्ससाठी 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा Squad


Pakistan squads for Asia Cup and Asian Games : काही दिवसाआधी आगामी महिला आशिया कप 2026 साठी बीसीसीआयने 15 सदस्यीय भारतीय महिला संघाची घोषणा केली होती. या स्पर्धेत हरमनप्रीत कौर हिच्याकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) यूएईमध्ये होणाऱ्या महिला आशिया कप आणि जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 साठी पाकिस्तानने आपला संघ जाहीर केला आहे. पाकिस्तानने अनुभवी फलंदाज आलिया रियाज हिला आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी संघात स्थान दिले आहे. मात्र सिदरा अमीन आणि सदफ शम्स यांना पुन्हा एकदा संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.

पाकिस्तानच्या नियमित कर्णधार फातिमा सना हिच्याकडे दोन्ही स्पर्धांमध्ये संघाचे नेतृत्व असेल. द हंड्रेड स्पर्धेत खेळत असल्यामुळे ती श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत सहभागी झाली नव्हती. मात्र आता ती पाकिस्तानच्या संघाचे नेतृत्व करण्यासाठी परतणार आहे.

आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तानचा थरार

महिला आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांना ग्रुप एमध्ये स्थान देण्यात आले आहे. या गटात भारत आणि पाकिस्तानसोबत हाँगकाँग आणि थायलंड हे संघ आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना 5 सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचे विशेष लक्ष असणार आहे. दोन्ही संघांमध्ये मैदानावरील चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धेची सुरुवात 28 ऑगस्टला होणार असून 13 सप्टेंबरला अंतिम सामना खेळवला जाणार आहे. आशिया कपमध्ये भारताचे लक्ष्य पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत विजेतेपदावर कब्जा करण्याचे असेल, तर पाकिस्तान भारताविरुद्धच्या सामन्यासह संपूर्ण स्पर्धेत आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करेल.

आशियाई क्रीडा स्पर्धेत पाकिस्तानला थेट क्वार्टर फायनल

दुसरीकडे, आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 जपानमध्ये होणार असून पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाला या स्पर्धेत थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळाला आहे. पाकिस्तानचा पहिला सामना 17 सप्टेंबरला थायलंडविरुद्ध होणार आहे. यानंतर 20 सप्टेंबरला उपांत्य फेरीचे सामने होतील. 22 सप्टेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल. याच दिवशी कांस्यपदकासाठीही सामना होणार आहे.
 
आशिया कपसाठी पाकिस्तान महिला संघ (Pakistan squad for Asia Cup) – फातिमा सना (कर्णधार), आयेशा जफर, इमान नसीर, आयमान फातिमा, गुल फिरोजा, मोमिना रियासत, मुनिबा अली सिद्दीकी (यष्टीरक्षक), नाझिहा अल्वी, नशरा सुंधू, सादिया इक्बाल, सायरा जबीन, शवाल जुल्फिकार, तुबा हसन, उम्म-ए-हानी, वहिदा अख्तर.

राखीव खेळाडू : तस्मिया रुबाब, हमना बिलाल, महम अनीस, सदफ शमास.

2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ (Pakistan squad for Asian Games 2026) – फातिम सना (कर्णधार), आलिया रियाझ, आयेशा जफर, इमान नसीर, आयमान फातिमा, गुल फिरोजा, हमना बिलाल, मोमिना रियासत, मुनीबा अली सिद्दीकी (यष्टीरक्षक), नशरा सुंधू, सायरा जबीन, शवाल जुल्फिकार, तस्मिया रुबाब, तुबा हसन आणि उम्म-ए-हानी. 

राखीव खेळाडू : नतालिया परवेझ, वहिदा अख्तर, सादिया इक्बाल, सय्यदा अरुब शाह आणि रमीन शमीम.

भारतीय महिला आशिया कप 2026 संघ (Team India squads for Women’s Asia Cup) :

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, भारती फुलमाली, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), गुणालन कमलिनी (यष्टीरक्षक), अरुंधती रेड्डी, प्रेमा रावत, राधा यादव, श्रीचरणी, रेणुका सिंह ठाकूर, नंदिनी शर्मा, क्रांती गौड आणि प्रतिका रावल.

हे ही वाचा –

WTC Points Table 2025-27 : बांगलादेश जिंकला, पण टीम इंडियाचं वाटोळं झालं, ऑस्ट्रेलिया हरल्यावर WTC टेबलमध्ये कोण वर, कोण खाली?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *