Novak Djokovic : उलट्या झाल्या, तरीही लढला, पराभूत होताच ढसाढसा रडला; US Open मध्ये धक्कादायक निकाल, नोव्हाक जोकोविच पहिल्याच फेरीत बाहेर


US Open Novak Djokovic News : टेनिसविश्वातील दिग्गज खेळाडू नोव्हाक जोकोविच यूएस ओपनमधून बाहेर गेला आहे. विक्रमी 25व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या शोधात असलेल्या जोकोव्हिचला अर्जेंटिनाच्या मारियानो नवोनेने (Mariano Navone)  पाच सेटच्या सामन्यात पराभूत केलं. या पराभवानंतर जोकोविचला कोर्टवरच आपले अश्रू अनावर झाले. सर्बियन स्टारला नवोनेविरुद्ध 6-7, 7-5, 6-4, 2-6, 1-6 असा पराभव स्वीकारावा लागला. जवळपास चार तास रंगलेल्या या सामन्यात जोकोव्हिचने एकवेळ सामना आपल्या बाजूने फिरवला होता, पण निर्णायक सेटमध्ये त्याची तब्येत बिघडली आणि अखेर त्याला सामना वाचवता आला नाही.

सामन्यादरम्यान नोव्हाक जोकोविचसोबत नेमकं काय घडलं?

आर्थर अॅश स्टेडियमवर सामना सुरू झाल्यापासूनच जोकोविच अस्वस्थ दिसत होता. न्यूयॉर्कमधील दमट आणि उष्ण वातावरणाचा त्याला मोठा त्रास होत असल्याचं दिसून आलं. त्याने वारंवार डोक्यावर बर्फाची पिशवी ठेवली. कोर्टवरील परिस्थितीमुळे तो त्रस्त असल्याचं स्पष्ट दिसत होतं. स्टेडियमचं छत बंद केल्यानंतरही त्याचा त्रास कमी झाला नाही. एसी सुरू करता येईल का, अशी विचारणाही त्याने सुपरवायझरकडे केली. मात्र, या सगळ्या अडचणी असूनही जोकोविचने हार मानली नाही.

तिसऱ्या सेटमध्ये कोर्टवरच उलट्या

सामन्याचा तिसरा सेट सुरू असताना जोकोविचची प्रकृती आणखी बिघडली. सहाव्या गेमदरम्यान त्याने कोर्टवरच अनेक उलट्या केल्या. तो कोर्टच्या मागील बाजूला वाकून उभा राहिला होता. या परिस्थितीतही त्याने सामना सोडला नाही. उलट पहिला सेट गमावल्यानंतर त्याने जबरदस्त पुनरागमन केलं. पहिला सेट जोकोविचने टायब्रेकरमध्ये गमावला. त्याच्या खेळात अनेक चुका होत होत्या. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये त्याने 7-5 असा विजय मिळवत सामन्यात पुनरागमन केलं. त्यानंतर तिसरा सेटही 6-4 असा जिंकला. एकीकडे शरीर साथ देत नव्हतं, तर दुसरीकडे अनुभवाच्या जोरावर जोकोविचने सामना 2-1 असा आपल्या बाजूने आणला. पण नवोनेने जोकोविचला पूर्णपणे परतण्याची संधी दिली नाही.

चौथ्या सेटमध्ये नवोनेचा पलटवार

चौथ्या सेटमध्ये अर्जेंटिनाच्या नवोनेने पुन्हा सामन्यावर नियंत्रण मिळवलं. त्याने आक्रमक खेळ करत चौथा सेट 6-2 असा जिंकला. त्यामुळे सामना निर्णायक पाचव्या सेटमध्ये पोहोचला. पाचव्या सेटमध्ये मात्र जोकोविचकडे नवोनेच्या वेगवान खेळाला उत्तर देण्यासाठी आवश्यक ऊर्जा उरली नव्हती. नवोनेने सुरुवातीपासूनच दबाव कायम ठेवला आणि 4-1 अशी आघाडी घेतली.

अन् जोकोविच कोर्टवरच रडला…

पाचव्या सेटमध्ये सामना हातातून निसटत असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर जोकोविच भावूक झाला. काही वेळाने त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. कोर्टवरच तो रडताना दिसला. दमट वातावरण, डिहायड्रेशन, आजारपण आणि प्रतिस्पर्ध्याच्या आक्रमक खेळाशी झुंज दिल्यानंतर अखेर त्याच्या भावनांचा बांध फुटला. स्टँडमध्ये उपस्थित असलेली त्याची पत्नी जेलेना हिलाही हा क्षण पाहून मोठा धक्का बसल्याचं दिसून आलं. जोकोविचने शेवटपर्यंत झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र नवोनेने कोणतीही चूक न करता निर्णायक सेट 6-1 असा जिंकला आणि आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या विजयांपैकी एक नोंदवला.

25व्या ग्रँडस्लॅमच्या स्वप्नाला मोठा धक्का

जोकोविच यूएस ओपनमध्ये 25वं ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवण्याच्या उद्देशाने उतरला होता. हे विजेतेपद मिळालं असतं तर पुरुषांच्या एकेरीतील ग्रँडस्लॅम विजेतेपदांचा तो एकटाच सर्वाधिक विक्रमधारक ठरला असता. याशिवाय यूएस ओपनमधील 98 सामन्यांच्या विजयांचा जिमी कॉनर्सचा विक्रम मागे टाकण्यासाठीही त्याला आणखी चार विजयांची गरज होती. मात्र, पहिल्याच फेरीत पराभव झाल्याने हे दोन्ही विक्रम सध्या त्याच्यापासून दूर गेले आहेत.

हे ही वाचा –

IPL Impact Player Rule : रोहित-हार्दिक-गिलने विरोध केला, BCCIने थेट 10 संघांना आदेश दिला! IPLचा वादग्रस्त नियम जाणार?





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *