Nashik Crime: सिद्धार्थ गोरे मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, दारू प्यायला आणि मग… तो Video समोर – Marathi News | Nashik Crime drunk and drive A new twist in the Siddharth Gore death case he drank alcohol and then accident happened that video has surfaced


सिद्धार्थ गोरे अपघात प्रकरणImage Credit source: एजन्सी

नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी विविध विकास योजना सुरू आहेत. रस्ते विकास करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी कामं सुरू आहेत. रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्ते खोदून ठेवल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर टाकलेल्या लोखंडी पाईपला धडकून सिद्धार्थ गोरे या तरुणाचा अपघात झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी नाशिककर संताप व्यक्त करत आहेत. कंत्राटदारावर संदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

अपघात प्रकरणाला नवीन वळण

अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बिअर बारमध्ये मद्यप्राशन करतानाचा सिद्धार्थ गोरेचा व्हिडिओ समोर आला आहे. मद्यधुंद अवस्थेत या युवकाचा वारंवार तोल जाताना दिसत आहे. दुचाकीवर बसतानाही युवकाला मदतीची गरज घेतल्याचे दिसले. काही युवकांनी दुचाकीवर बसवून दिल्याचं व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर दुचाकी चालवताना अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातानंतर महापालिका प्रशासनावरही टीका झाली होती. रस्त्यांच्या कामांमुळे अपघात वाढल्याचा नागरिकांचा आरोप आहे. मात्र व्हायरल व्हिडिओमुळे अपघाताला नवे वळणं मिळाले आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवण्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रस्ते दोषी की चालकाची चूक? व्हिडिओमुळे असा सवाल विचारल्या जात आहे.

अपघाताची घटना घडल्यानंतर सुरुवातीला नागरिकांनी नाशिक महानगरपालिका प्रशासनावर जोरदार टीका केली होती. शहरातील रस्त्यांची दुरावस्था, अर्धवट कामे आणि खड्ड्यांमुळेच हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला होता. पण आता हा व्हिडिओसमोर आल्यानंतर नवीन वाद निर्माण झाला आहे.

8 महिन्यांची चिमुकली बेपत्ता

नाशिक जिल्ह्यात 8 महिन्यांच्या चिमुकलीच्या बेपत्ता होण्याने खळबळ उडाली आहे. नांदगाव तालुक्यातील मन्याड चौकी येथे मध्यरात्रीची घटना घडली आहे. मध्यरात्री 12 वाजेच्या दरम्यान आई – वडिलांच्या अंथरुणावरून चिमुरडी गायब झाली होती. स्थानिक गुन्हे शाखा, वरिष्ठ पोलीस यंत्रणेसह स्थानिकांकडून चिमुरडीचा कसून शोध घेण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटना स्थळी तळ ठोकून होते. या प्रकरणी नांदगाव पोलिसात चिमुकलीच्या वडिलांनी दिली अपहरणाची फिर्याद दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *