Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती


Nagpur SIR News: मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेत नागपूर जिल्ह्यात तब्बल 2 लाख 99 हजार 647 मतदार त्यांच्या मूळ पत्त्यावर आढळून आले नसल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय 4 लाख 48 हजार 223 मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित, तर 2 लाख 25 हजार 627 मतदार मृत असल्याचे प्रशासनाच्या तपासणीत निष्पन्न झाले आहे. (Nagpur SIR)

नागपूर जिल्ह्यात मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत 1 लाख 4 हजार 449 मतदारांची नावे दुबार असल्याचेही आढळून आले आहे. त्यामुळे मतदार यादीच्या शुद्धीकरण मोहिमेत मोठ्या प्रमाणावर संशयास्पद अथवा अद्ययावत करण्याची गरज असलेल्या नोंदी समोर आल्या आहेत. नागपूर जिल्ह्यात एकूण 46 लाख 38 हजार 459 मतदार आहेत. या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून (BLO) विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत 46 लाख 12 हजार 992 मतदारांपर्यंत बीएलओ पोहोचले आहेत. त्यांना मतदार नोंदणीसाठी आवश्यक अर्ज देण्यात आले असून, यापैकी 31 लाख 30 हजार 213 मतदारांचे अर्ज संगणकीकृत (डिजिटलाईज) करण्यात आले आहेत. (SIR Maharashtra)

रोहित पवारांची SIR वरुन टीका- (Rohit Pawar On SIR)

कोणतीही निवडणूक तोंडावर नसतानाही महाराष्ट्रात ‘SIR’ मोहीम एवढ्या घाईघाईत का राबवली जातेय? केवळ 4 दिवस उरले असताना 18% मतदारांची प्रपत्रे अद्याप जमा झालेली नाहीत. पश्चिम बंगालमध्येही 12% (91 लाख) मतदारांची नावे वगळून लोकशाहीचा ज्याप्रमाणे गळा घोटला तोच बंगाल_पॅटर्न महाराष्ट्रात राबवून मतदारांचा हक्क हिरावून घेऊन सत्तेचा मार्ग सोपा करण्याचा राजकीय कट सरकारकडून रचला जातोय का? अशी शंका यामुळं निर्माण होते, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी सांगितले. पुरेशी संधी आणि वेळ दिल्याशिवाय कोणत्याही मतदाराला लोकशाहीने दिलेला मतदानाचा पवित्र हक्क हिरावून घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगासह कुणालाच नाही. सरकार पुरस्कृत हा कट आम्हीही कदापि यशस्वी होऊ देणार नाही. मतदारांना प्रपत्रे जमा करण्यासाठी निवडणूक आयोगाने तातडीने वेळ वाढवून द्यावा, प्रसंगी स्वतःच्या यंत्रणेमार्फतही खात्री करावी. याबाबतच चर्चा करण्यासाठीच वेळ देण्याची विनंती आम्ही निवडणूक आयोगाला केली, परंतु अद्यापही वेळ देण्यात आलेली नाही, आम्ही अजूनही वाट पहात आहोत, असं रोहित पवार म्हणाले. 

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, Video:



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *