Mukesh Khanna On SHarmila Tagore: ‘लग्नासाठी तुम्ही आयेशा बेगम झालात ‘ शर्मिला टागोरांच्या ‘वंदे मातरम्’ वक्तव्यावर मुकेश खन्ना भडकले, म्हणाले…


Mukesh Khanna on Sharmila Tagore Vande Mataram Remark: ‘वंदे मातरम्’वरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री अन् भाजप खासदार कंगना रनौतनंतर आता अभिनेता मुकेश खन्ना यांनी अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या कथित वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. मुकेश खन्ना यांनी त्यांच्या विचारांवरच सवाल उपस्थित केले आहेत. ‘द फ्री प्रेस जर्नल’ला दिलेल्या मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी शर्मिला टागोर यांच्या लग्नाचा संदर्भ दिला. लग्नानंतर शर्मिला टागोर ‘आयशा बेगम’ झाल्या आणि आता त्या दुसऱ्या धर्मातील लोकांच्या भावनांची चिंता करत आहेत, असं ते म्हणाले.

काय म्हणाले मुकेश खन्ना?

ते म्हणाले ‘तुमच्या बंगालमध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात ‘काली पूजा’ होते, तेवढी दुसरीकडे कुठेही होत नाही. तुम्ही ते बघत मोठा झाला आहात. आज तुम्हाला असं लक्षात येतंय की, एखाद्या धर्मातला व्यक्ती ‘वंदे मातरम’ला स्वीकारणार नाही. यापूर्वी तुमचं हे लक्षात आलं नव्हतं. ‘लग्नानंतर नवाबची बेगम झालात त्यानंतर तुम्हाला हे कळलं का?’ तेव्हा तुम्हाला कळलं का की अरे मुस्लिम धर्म पण आहे.आयेशा बेगम नाव होतं त्यांचं. आयुष्याला बाजूला ठेवलं शर्मिला म्हणून पुढे गेल्या.जे फायद्याचं होतं ते केलं.लग्नासाठी आयेशा बेगम बनल्या. पण आता तुम्ही बोलताय आयुष्या बेगम म्हणून. आज तुम्हाला मुस्लिम धर्म कळतोय.हिंदू धर्म विसरलात का तुम्ही ? असा सवाल अभिनेते मुकेश खन्ना यांनी केला.

हिंदू धर्माबाबतही मुकेश खन्नांनी मांडलं मत

याच मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी हिंदू धर्मातील देवी-देवतांबाबतही आपलं मत मांडलं. हिंदू धर्मात 33 कोटी देवी-देवतांचा उल्लेख केला जातो, मात्र त्याचा अर्थ 33 कोटी वेगवेगळे देव आहेत असा होत नाही, असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या मते, ईश्वर निराकार आहे. भक्त आपल्या श्रद्धेनुसार त्याला राम, कृष्ण, शिव किंवा हनुमानाच्या रूपात पाहू शकतो.  शर्मिला टागोर असं म्हणाल्या होत्या की, “भारतात अनेक धर्म आणि श्रद्धा मानणारे लोक राहतात. त्यापैकी अनेक जण अनेक देवतांऐवजी एका ईश्वरावर विश्वास ठेवतात. वंदे मातरम मधील काही कडव्यांमध्ये अनेक दैवतांची स्तुती करण्यात आली आहे.” 

‘वंदे मातरम्’वर काय म्हणाले मुकेश खन्ना?

‘वंदे मातरम्’च्या वादावर बोलताना मुकेश खन्ना म्हणाले की, या गीताला होणारा विरोध केवळ त्यात देवी-देवतांचा उल्लेख असल्यामुळे नाही. काही लोकांची अशीही भूमिका आहे की, ते देवाशिवाय इतर कोणासमोरही नतमस्तक होऊ शकत नाहीत, असा दावा त्यांनी केला. यावेळी त्यांनी ए. आर. रहमान यांच्या ‘मां तुझे सलाम’ या गाण्याचं उदाहरण दिलं. या गाण्यातही देशाला आई मानून तिला सलाम केला जातो, असं त्यांनी सांगितलं. त्यांनी असंही म्हटलं की कोणालाही जबरदस्तीने नतमस्तक होण्याची सक्ती केली जाऊ नये. 

कंगनानेही केलेला शर्मिला टागोरांना विरोध

शर्मिला टागोर यांनी ‘वंदे मातरम्’ मधील काही ओळींवर आक्षेप घेतला होता. त्यांच्या वक्तव्यावर अभिनेत्री व खासदार कंगना रनौतने नाराजी व्यक्त केली. ‘कृपया हिंदू मुस्लिम मानसिकतेच्या पलीकडे या, असं म्हणत त्यांनी पोस्टच्या शेवटी शर्मिला टागोर यांच्याबद्दल आपुलकी व्यक्त करत, चला एकमेकांना आपलंसं करून मिठी मारूया, असं कंगनाने म्हटलं. 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *