Mohsin Naqvi Team India Asia Cup 2026 : स्मृती मानधना निघून गेली, मोहसीन नक्वी घाईघाईने पळत बाहेर गेला, पण स्टेडियमबाहेर पाकिस्तानी फॅनने गाडी अडवली अन्… नेमकं काय घडलं?


India refuses Women’s Asia Cup trophy from Mohsin Naqvi : 2026 च्या महिला आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेला 72 धावांनी पराभूत करून आठव्यांदा आशिया कपचे विजेतेपद पटकावले. पण भारतीय महिला संघाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमबाहेरील दृश्य अधिकच चर्चेचा विषय बनले. स्टेडियममधील प्रेक्षक ट्रॉफी चोर अशा घोषणा देत होते, मोहसीन नक्वी यांना घाईघाईने आपल्या गाडीकडे धाव घ्यावी लागली. ते आपल्या गाडीच्या पुढच्या सीटवरून घाईघाईने निघून गेले. पण, स्टेडियमबाहेरील काही पाकिस्तानी चाहत्यांच्या प्रतिक्रियेने जगाला धक्का बसला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, जगभरातून पाकिस्तानचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.

पीसीबी प्रमुख गाडीतून पळून गेले… (Mohsin Naqvi Leaves Dubai Stadium)

अपमानित झाल्यानंतर मोहसिन नक्वी घाईघाईने स्टेडियममधून गाडीतून निघून जात असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी, तिथे उपस्थित असलेले काही पाकिस्तानी क्रिकेट चाहते नक्वी यांच्याकडे जाऊन टिप्पणी करताना दिसत आहेत. पाकिस्तानी चाहत्यांनी नक्वी यांच्या कामाबद्दल आनंद आणि अभिमान व्यक्त केला. इतकेच नाही, तर आपल्या संघाचे सततचे अपयश आणि पाकिस्तानी क्रिकेटची घसरण याकडे दुर्लक्ष करून, या समर्थकांनी भारतीय महिला क्रिकेट संघ ट्रॉफीसाठी पात्र नाही असा दावाही केला.

भारत-श्रीलंका अंतिम सामन्यात काय घडलं? (India vs Sri Lanka Final Women’s Asia Cup 2026)

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारताने प्रथम फलंदाजी करताना 183 धावांचा डोंगर उभारला. शेफाली वर्माने 69 धावांची तुफानी खेळी केली, तर स्मृती मंधानाने 59 धावांचं अर्धशतक झळकावलं. या दोघींच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने श्रीलंकेसमोर मोठं आव्हान उभं केलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव अवघ्या 111 धावांवर आटोपला. भारताकडून दीप्ती शर्माने शानदार गोलंदाजी करत चार विकेट्स घेतल्या. श्री चरणीनेही तीन विकेट्स मिळवत श्रीलंकेच्या फलंदाजीची कंबर मोडली. भारताने अखेर 72 धावांनी विजय मिळवत महिला आशिया कपच्या इतिहासात आठव्यांदा विजेतेपद पटकावलं.

हे ही वाचा –

BCCI on Mohsin Naqvi : स्टेजवर मोहसीन नक्वी दिसले, टीम इंडियाचा ट्रॉफी घेण्यास नकार; आशिया कप वादावर BCCIची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चात्ताप…





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *