Medha Manjrekar : महेश मांजरेकरांच्या पत्नी मेधा मांजरेकर यांना कॅन्सर? सोशल मीडियावरील ‘त्या’ पोस्टने वेधले लक्ष


मुंबई : मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री मेधा मांजरेकर (Medha Manjrekar) यांना एका गंभीर आजाराचं निदान झाले आहे. मेधा मांजरेकर यांनी स्वतः सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत त्यांना कॅन्सर (Cancer) झाल्याचं आणि त्यावरील उपचारांचा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाल्याचे चाहत्यांना सांगितलं आहे.

या कठीण प्रवासात कुटुंब, मित्रपरिवार आणि देवाने दिलेली साथ याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. मेधा मांजरेकर यांच्या या पोस्टनंतर मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि चाहत्यांकडून त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी प्रार्थना केली जात आहे.

Medha Manjrekar Instagram Post : “हा प्रवास मी कधीच एकटीने केला नाही…”

अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “कॅन्सरचे निदान, त्यानंतर झालेली शस्त्रक्रिया (Surgery), केमोथेरपी आणि रेडिएशनपेक्षा या अत्यंत कठीण काळात मला लोकांकडून मिळालेले प्रेम, साथ आणि आशीर्वाद याचीच मला जास्त आठवण आहे. मी आता पुढे पाऊल टाकू शकत नाही, असे ज्या ज्या वेळी मला वाटले, त्या त्या वेळी कुणीतरी माझ्या मदतीला धावून आले. देवानेच माझा हात धरून मला मोठा आधार दिला आहे.”

त्यांनी पुढं लिहिलं की, “या कठीण काळात आपण कधीच एकटे नव्हतो, देवाने विविध व्यक्तींच्या रूपाने मला साथ दिली. मी हा प्रवास कधीच एकटीने केला नाही. तर माझे गुरू, डॉक्टर्स, परिचारिका, कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी आणि माझे पती महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे मला हा कठीण प्रवास पार करता आला.” या शब्दांत त्यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत.

Mahesh Manjrekar Wife Health : संकटाशी लढण्याची मिळाली ताकद

आपल्या भावना मांडताना मेधा मांजरेकर यांनी सांगितले की, “माझ्याच बाबतीत असे का घडले? असा नकारात्मक प्रश्न विचारण्याऐवजी देवावर पूर्ण विश्वास ठेवत प्रत्येक संकटामागे काहीतरी चांगला उद्देश असतो, हे आपण या प्रवासात शिकलो आहोत. या आजारपणाच्या काळात मुलींनी आईचा हात धरून दिलेली सोबत हा आपल्या आयुष्यातील अत्यंत भावनिक आणि ताकद देणारा अनुभव होता, असंही त्यांनी नमूद केलं.

उपचारादरम्यान मित्रपरिवाराने घेतलेली छोटी-छोटी काळजी, आवडीचे पदार्थ आणून देणे, सतत आनंदी ठेवणे आणि खचू न देता मानसिक आधार देणे यामुळे हा वेदनादायी प्रवास खूप सोपा झाला. शेवटी, केवळ निस्सीम प्रेम, विश्वास आणि माणसांची खंबीर साथ यांच्यामुळेच आपल्याला या गंभीर आजाराशी लढण्याची ताकद मिळाली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

ही बातमी वाचा: 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *