मोबाइल रिचार्ज करताना केवळ डेटा आणि कॉलिंगच नाही, तर OTT आणि AI सुविधाही मिळाव्यात अशी अनेकांची अपेक्षा असते. रिलायन्स जिओच्या 719 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये अशाच अनेक सुविधा एकत्र देण्यात आल्या आहेत. या प्लॅनमध्ये 70 दिवसांची वैधता, दररोज 2GB हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. याशिवाय JioHotstar, JioAICloud आणि Google Gemini Pro सारखे अतिरिक्त फायदेही मिळत आहेत.