IPL 2026: असं कसं…! कृणाल पांड्याची गोलंदाजी पाहून काव्या मारनच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह, Video Viral – Marathi News | Ipl 2026 srh vs rcb Kavya Maran confused after seeing Krunal Pandya bowling style Video Viral


IPL 2026: असं कसं…! कृणाल पांड्याची गोलंदाजी पाहून काव्या मारनच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह, Video ViralImage Credit source: IPL/Twitter/TV9 Kannad

आयपीएल 2026 स्पर्धेतील 67व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना सनरायझर्स हैदराबादने 55 धावांनी जिंकला. या सामन्याला वादाची किनार लाभली. कारण या सामन्यात विराट कोहली आणि ट्रेव्हिस हेड यांच्यात शा‍ब्दिक चकमक झाली. हा मुद्दा सोशल मीडियावर चांगलाच गाजला आहे. आता आणखी एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. डावखुरा पारंपरिक फिरकी गोलंदाज कृणाल पांड्या आपल्या विचित्र गोलंदाजी शैलीने फलंदाजांना अधूनमधून गोंधळात टाकतो. त्याच्या बाउन्सरची चर्चा होत आहे. कारण त्याच्या गोलंदाजीचा सामना करताना अचानक आलेल्या बाउंसरने फलंदाज अनेकदा फसले आहेत. पण सनरायझर्स हैदराबाद फ्रेंचायझीची मालकिन काव्या मारन यांनी आरसीबीचा फिरकी गोलंदाज कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर नाराजी व्यक्त केली आहे. कृणाल पांड्याच्या गोलंदाजीच्या शैलीची तिने अप्रत्यक्षरित्या तक्रार केली.

अशी होती काव्या मारनची रिएक्शन

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात कृणाल पांड्याने फक्त दोन षटकं टाकली. त्यात त्याने फिरकीऐवजी जास्तीत जास्त बाउंसर टाकण्याचा प्रयत्न केला. पण बाउंसर टाकताना त्याच्या गोलंदाजीची शैली पाहून सनरायझर्स हैदराबादचे मालकिन काव्या मारन आश्चर्यचकीत झाल्या. तिने आपल्या शेजारी उभ्या असलेल्या प्रसिद्ध तेलुगू अभिनेते व्हिक्टरी व्यंकटेश यांच्याकडे हातवारे करत, ‘हा माणूस काय गोलंदाजी करतोय? हे नियमांच्या विरुद्ध नाही का?’ असे विचारून आपली नाराजी व्यक्त केली. काव्या यांची ही नाराजी कॅमेऱ्यात चित्रित झाली असून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

सनरायझर्स हैदराबादचं टॉप 2 चं गणित चुकलं

आयपीएल स्पर्धेतील या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमवून 255 धावा केल्या होत्या. टॉप 2 मध्ये जागा मिळवण्यासाठी हैदराबादला हा सामना 90 धावांनी जिंकायचा होता. म्हणजेच आरसीबीला 165 धावांवर रोखणं गरजेचं होतं. पण आरसीबीने 20 षटकात 4 गडी गमवून 200 धावा केल्या. हा सामना सनरायझर्स हैदराबादने 55 धावांनी जिंकला. पण सनरायझर्स हैदराबादचं नेट रनरेटचं गणित 35 धावांनी चुकलं. त्यामुळे आता एलिमिनेटर फेरीत खेळावं लागणार आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *