IND vs SL 2nd Test : मानव सुथारची ‘ती’ जादुई फिरकी अन् ऋषभ पंतची ‘रॉकेट’ स्टंपिंग! श्रीलंकेचा काळजाचा ठोका चुकवणारा ‘गेम ओव्हर’, पाहा VIDEO


Rishabh Pant Stumping Pasindu Sooriyabandara OUT : कोलंबोच्या ऐतिहासिक सिंहलीज स्पोर्ट्स क्लब (SSC) मैदानावर भारत आणि श्रीलंका दरम्यान सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशीचा खेळ सुरू आहे. दरम्यान, भारतीय गोलंदाज मानव सुथारने पुन्हा एकदा श्रीलंकेला मोठा धक्का दिला आहे. सुथारने पसिंदू सूरियाबंदराला 92 धावांवर आऊट केले. या विकेटमध्ये यष्टीरक्षक ऋषभ पंत च्या भन्नाट स्टंपिंगचाही मोठा वाटा राहिला. ज्यामुळे दुसऱ्या डावात शतक पूर्ण करण्याची पसिंदूची संधी हुकली. सुथारच्या चतुर गोलंदाजीसमोर त्याने पुढे येण्याचा प्रयत्न केला आणि पंतने स्टंपिंग करत त्याचा डाव संपवला.

नेमकं काय घडलं? (Pasindu Sooriyabandara IND vs SL 2nd Test)

दोन्ही डावांत अप्रतिम फलंदाजी करणाऱ्या पसिंदू सूरियाबंदराने पहिल्या डावात 80 तर दुसऱ्या डावात 92 धावांची संयमी खेळी केली. दुर्दैवाने, दोन्ही डावांत त्याचे शतक अवघ्या काही धावांनी हुकले. पसिंदू पुढे येऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ओळखताच सुथारने चेंडूचा वेग कमी करत तो ऑफ स्टंपच्या बाहेर फिरवला. सुथारच्या फिरकीला पसिंदूचा अंदाज चुकल्यामुळे तो क्रीझ सोडून पुढे आला. चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही आणि यष्ट्यांच्या मागे उभ्या असलेल्या पंतने कोणतीही चूक न करता सेकंदाच्या फ्रॅक्शनमध्ये यष्ट्या उडवल्या.

अवघ्या 8 धावांनी शतक हुकले (Rishabh Pant Stumping Pasindu Sooriyabandara)

कोलंबोच्या ऐतिहासिक सिंहलीज स्पोर्ट्स क्लब (SSC) मैदानावर भारत आणि श्रीलंका दरम्यान सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशीचा खेळ सुरू आहे.  भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजीचा धुमाकूळ घालत 9 बाद 503 धावांवर आपला डाव घोषित केला होता. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा पहिला डाव 290 धावांत आटोपला. त्यामुळे भारताला पहिल्या डावात तब्बल 213 धावांची भक्कम आघाडी मिळाली. भारताने श्रीलंकेला ‘फॉलोऑन’ देण्याचा निर्णय घेतला. 

अवघ्या 8 धावांनी शतक हुकल्यामुळे पसिंदू सूरियाबंदरा स्वतःवर प्रचंड रागावलेला दिसला. त्याने 173 चेंडूंत 10 चौकार आणि 1 षटकारासह 92 धावांची खेळी केली. पसिंदू आऊट झाल्यानंतर श्रीलंकेकडे आता 4 फलंदाज शिल्लक असून त्यांची आघाडी अवघ्या 12 धावांची आहे. भारतीय गोलंदाज श्रीलंकेचा उरलेला डाव लवकरात लवकर गुंडाळून सामना आपल्या खिशात घालण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानावर उतरले आहेत. 

हे ही वाचा –

ICC Test Rankings : अरेरे बुमराहचं सिंहासन गेलं! मिचेल स्टार्क इतिहासात पहिल्यांदाच बनला नंबर-1; तर ऋषभ पंतचीही मोठी झेप, ICC रँकिंगमध्ये मोठा उलटफेर





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *