Horoscope Today 15 November 2026: आजचा रविवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य…


Horoscope Today 15 November 2026: वैदिक पंचांगानुसार, आज, 15 नोव्हेंबर 2026, आज रविवार असल्याने हा दिवस अत्यंत खास आहे, आजचा दिवस सूर्यदेवांना समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. सूर्यदेवांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या…

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस पूर्वीची जुनी दुखणी डोके वर काढतील, औषधोपचार आणि पथ्य पाणी वेळेवर घेणे आवश्यक आहे.

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस आज सतत उद्योगशील आणि महत्वकांक्षी राहाल, त्यासाठी आवश्यक असणारे बळ आणि परिस्थितीवर मात करण्याची शक्ती तुम्हाला निश्चित ग्रह देणार आहेत.

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस नसती काळजी करू नका, नोकरी करणाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर करू नये

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस दुसऱ्याच्या तंत्राने चाळणी तुम्हाला जमणार नाही, थोड्या चंचल स्वभावामुळे नुकसान संभवते

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस महिलांनी घरातील लोकांशी सौख्ख्य ठेवण्याचा प्रयत्न करावा, नोकरी व्यवसायात थोडे धाडस करायला हरकत नाही

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस आर्थिक मान वाढेल, ज्यांचा मुख्यता बोलण्याचा व्यवसाय आहे त्यांना आर्थिक फायद्याच्या दृष्टीने संधी मिळतील

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस संततीच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल, विद्यार्थ्यांनी हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नये 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस उपासना मार्गात मन रमून जाईल, ज्येष्ठ ने पथ्य पाणी सांभाळणे आवश्यक राहील 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस घरामध्ये काही कलात्मक बदल करण्याच्या मागे लागाल, त्यासाठी बराचसा खर्चही करण्याची तयारी दाखवाल 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस स्वभावातील कणखरपणा व्यवहारात निश्चित उपयोगी पडून भाग्याची साथ तुम्हाला मिळणार आहे, तुमच्यातील कल्पनाशक्ती तुम्हाला उत्तम काम करण्यास प्रेरणा देईल 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस खोचक बोलून दुसऱ्यातील अवघं शोधण्याचे टाळा, अति स्पष्ट वक्तेपणा गोत्यात आणण्याची शक्यता आहे 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस नोकरी धंद्यामध्ये शुद्ध वैचारिक भूमिका ठेवल्यामुळे दूरगामी फायदे होतील, स्फूर्तीदायक घटना घडतील.

हेही वाचा : 

November Horoscope 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या.. नोव्हेंबरचे शेवटचे 15 दिवस आयुष्यात मोठा युू-टर्न! 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, पैसा, नोकरी… राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *