Hanuman Ansh Box office collection: नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ (Hanuman Ansh Box Office collection) चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड अद्याप सुरूच आहे. नव्या चित्रपटांच्या रिलीजमुळे ‘हनुमान अंश’चे (Hanuman Ansh) शो जवळपास निम्म्यावर आले असतानाही कमाईत मात्र मोठी वाढ झाली आहे. रिलीजच्या 51व्या दिवशी चित्रपटाने 3,979 शोमधून 6.50 कोटी रुपयांची नेट कमाई केली. विशेष म्हणजे, आठव्या शनिवारी चित्रपटाच्या कमाईत तब्बल 94 टक्क्यांची वाढ झाली आहे.
हनुमान अंशचे शोज घसरले…(Hanuman Ansh)
‘द पैराडाइज’, ‘द वन’ आणि ‘अँवेंजर्स एंडगेम एन्कोर’च्या रिलीजमुळे ‘हनुमान अंश’चे शो कमी झाले. बुधवारी 7,358 शो असलेल्या या चित्रपटाचे शुक्रवारी केवळ 3,979 शो लागले होते. म्हणजेच चार दिवसांत शोमध्ये सुमारे 46 टक्क्यांची घट झाली. मात्र, कमाईचा वेग कायम राहिला आहे. बुधवारी 3.75 कोटी, गुरुवारी 3.50 कोटी, शुक्रवारी 3.35 कोटी आणि शनिवारी थेट 6.50 कोटी रुपयांची कमाई झाली.
300 कोटींच्या क्लबपासून हाकेच्या अंतरावर( Hanuman Ansh box office collection)
Sacnilkच्या आकडेवारीनुसार, भारतात ‘हनुमान अंश’ची नेट कमाई आता 298.03 कोटी रुपये, तर ग्रॉस कलेक्शन 352.10 कोटी रुपये झालं आहे. म्हणजेच 300 कोटींच्या क्लबमध्ये जाण्यासाठी चित्रपटाला आता अवघे 1.97 कोटी रुपये हवे आहेत. चित्रपटाच बजेट सुमारे 2 कोटी रुपये असल्याने, त्याच्या तुलनेत नफ्याचा आकडा तब्बल 14,801 टक्क्यांहून अधिक असल्याचा दावा केला जात आहे.
परदेशातील कमाई धरून चित्रपटाने आतापर्यंत 389.85 कोटी रुपयांचा वर्ल्डवाइड ग्रॉस कलेक्शन केला आहे. त्यामुळे 400 कोटींच्या क्लबवरही आता लक्ष आहे.दरम्यान, ‘मिर्झापूर द मूवी’ने शनिवारी 1.55 कोटी, ‘वाइब’ने 90 लाख, तर ‘दायरा’ने केवळ 22 लाख रुपयांची कमाई केली.
PM मोदींनी ‘हनुमान अंश’मधील ‘पार्वती’ भजनावर वाजवली खंजरी
गायक साधू तिवारी यांनीही या कार्यक्रमात पीएम मोदींसमोर परफॉर्म केलं. त्यांनी ‘हनुमान अंश’ चित्रपटातील ‘पार्वती’ हे गाणं सादर केलं. यावेळी पीएम मोदी उपस्थितांमध्ये बसून खंजरी वाजवत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.या कार्यक्रमाचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शुक्रवारी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘भजन क्लबिंग’ कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांनी तरुणांमध्ये बसून भक्तिगीतांचा आनंद घेतला.
सविस्तर वृत्त: PM मोदींसमोर ‘हनुमान अंश’मधील ‘पार्वती’ भजन वाजताच खंजरी वाजवत मोदीही झाले तल्लीन, Video